कु.खुषी पवन पनपालिया सी.ए परिक्षेत उत्तीर्ण

बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क-
शहरातील वल्लभ नगर येथील रहिवासी पवन पनपालिया यांची मुलगी खुषी पवन पनपानिया सी.ए. परिक्षेत वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या आहेत. या शाबद्दल तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नुकताच सी.ए. परिक्षेचा निकाल लागला आहे. या परिक्षेत परळी येथील वल्लभ नगर येथील खुषी पनपानिया ही ४१७ गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. खुषी पनपालिया ही सुरुवाती पासुन अभ्यासात हुशार होती. इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण परळी येथील भेल शाळेत झाले आहे. अकरावी व बारावी पर्यंतचे शिक्षण लातुर येथे झाले आहे. बीकॉम पुणे येथे झाले आहे. तसेच तीचे सी ए होण्याचे स्वप्न पहिल्याच प्रयत्नात पुर्ण केले आहे. तीच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.