🔷 परळीत निष्ठावंत शिवसैनिकांच्या वतीने फटाके वाजवत, पेढे वाटून जल्लोष साजरा केला
बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क : संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या शिवसेना कोणाची या प्रकरणावर गेली अठरा महिने दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे सुरू असताना सुप्रीम कोर्टाने निर्णयाचे अधिकार विधानसभा अध्यक्षकडे बहाल केले व दहा जानेवारी पर्यंत दोन्ही गटाची तपासणी करून निकाल देण्यासाठी अध्यादेश काढण्यात आला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाकडून सादर करण्यात आलेली घटना व निवडणुक आयोगाने दिलेली घटना यांचा संपूर्ण अभ्यास करून विधिमंडळ बहुमताच्या आधारावर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाचे परळी शिवसेनेच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. राणी लक्ष्मबाईं टॉवर येथे शिवसेना नेते व्यंकटेश शिंदे, शिवसेना शहर प्रमुख वैजनाथ माने, दीपक शिंदे, मोहन राजमाने, संतोष चौधरी,सरपंच दत्ता देशमुख यांनी फटाके फोडत, निष्ठावंत शिवसैनिकांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपशहर प्रमुख विठ्ल गायकवाड, बाळासाहेब खोसे, शहर संघटक सचिन सोनवणे, सुदर्शन यादव, रामभाऊ घोलप, परमेश्वर वाघमारे, नारायण दादा पांचाळ, अरुण माने, यश वेडे, अंकुश पुदाले, गोविंद गरड, विशाल शिंदे, राजेश शिंदे, नितीन शिंदे, गजानन थळकरी, आदी शिवसैनिक उपस्थित होते.