महिला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील विध्यार्थिनींची पंचायत समिती कार्यालयास भेट.

प्रत्यक्ष भेट -कार्यलयीन कामकाज – पंचायत समिति 
बीड /परळी-वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क – महाविद्यालयीन अभ्यासातील राज्यशास्त्र विषयाच्या  विद्यार्थिनींना अभ्यासाशी निगडीत प्रत्यक्ष भेट देऊन कामकाज आणि कार्यालयीन भेटी महत्वपूर्ण ठरतात. नुकतीच शहरातील  कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची राज्यशास्त्र विभागातील   आर.पी.शहाणे.
राज्यशास्त्र विभाग प्रमुख. व प्रा.राठोड एस.पी. यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती दायक शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती. या अंतर्गत  पंचायत समिती कार्यालय परळी वैजनाथ येथे भेट देण्यात आली.
 या भेटीत पंचायत समिती कार्यालय अधिक्षक श्री. दराडे एस.पी. यांनी सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना पंचायत समितीच्या कामकाजाची माहिती देण्यास सांगीतले. सर्व विध्यार्थीनींनी पंचायत समितीचे सर्व विभाग जसे सामान्य प्रशासन विभाग,लेखा विभाग,पाणीपुरवठा विभाग,बाधकाम विभाग,आरोग्य विभाग,एकात्मिक बाल विकास विभाग,  आपत्कालीन विभागा या सर्व विभागाला भेटी देऊन माहिती मिळवली.
पंचायत समितीच्या विविध विभागात तो विभाग पाहणारे अधीकारी श्री.दराडे पी. एस.,श्री.बाळासाहेब गिरी,श्री.नितेश ढगवे, सुरज सोनवणे,दीपक दुर्गदासराव अग्निहोत्री,श्री संतोष मुंडे,श्री सचिन हरनावल आणि सर्व कर्मचारी यांनी विद्यार्थिनींना सपूर्ण सहकार्य केले. यावेळी राज्यशास्त्र विषयाच्या बी. ऐ. च्या विद्यार्थिनी राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. शहाणे आर.पी., प्रा. राठोड एस.पी.,  दुधाट आशालता उपस्थित होते.