“सिंदूर बावडी ” पुष्करणी बांधकामाचा उत्कृष्ट ठेवा

🔸सर्व छायाचित्रे-के नमिता प्रशांत

🔷 ऐतिहासिक बारव/ विहीर/बावडी/ कूप/वापी/ “सिंदूर बावडी

नागपूर /रामटेक -के  नमिताप्रशांत.-एम एन सी न्यूज नेटवर्क- रामटेक येथील प्रसिद्ध अशी येथील “सिंदूर बावडी” ही आणखी एक ऐतिहासिक पुष्करिणी आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने सिंदूर बावडीचा उल्लेख “दत्तात्रेय मंदिरासमोरील टाकी आणि मंडप” म्हणून केलेला आहे कारण येथे यात्रेकरूंसाठी एक चोल्ट्री (स्तंभ असलेला मंडप) व पाण्याची व्यवस्था म्हणून बांधलेली सार्वजनिक पाण्याची मोठी टाकी आहे.

ही जवळपास 5व्या शतकातील आणि वाकाटक कालखंडातील प्राचीन बावडी असून रामटेक येथील गडमंदिराच्या अगदी जवळच आहे.
आम्ही गेलो तेव्हा या बावडीला भरपूर पाणी होते त्यामुळे याची खास वैशिष्ट्यपुर्ण रचना तुम्हांला बघता यावी म्हणून काही फोटो गुगलमामाकडून घेतले आहेत.

नवल आहे, मुख्य मंदिराच्या इतक्या जवळ असूनही पर्यटक मात्र एवढ्या सुंदर प्राचीन वास्तूकडे दुर्लक्ष करतात ते येथे ऐकिवात अफवामुळे… असो, साक्षात फिरणारी भुतं मात्र येथे मनसोक्त फिरून येऊ शकतात माझ्यासारखी.. तेही ठणठणीत 👍👍

कुठल्याही फालतू गोष्टींवर मुळीच विश्वास ठेवू नये, अवश्य भेट द्यावी असं हे विशेष आणि रम्य ठिकाण आहे.