तलाठी अर्चना गोरे, मोनिका चव्हाण राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्काराने सन्मानित.

बीड/ परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क – तालुक्यातील संगम येथे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त संगम येथे कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिजाऊ रत्न पुरस्काराने अनेकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस माता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलत असताना महामंडलेश्वर १००८ परम तपस्वी साध्वी दुर्गा मा म्हणाल्या की, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने येण्याचे आम्हाला भाग्य लाभले. महाराष्ट्राचा जाज्वल्य असा इतिहास आहे. या इतिहासाच्या जडण घडणीत जिजाऊंचा मोठा हातभार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सौ उषा गित्ते, डॉ.शालिनी कराड, निर्मला विटेकर, वच्छला कोकाटे, चेतना गौरशेटे, राधिका जायभाये, रमा आलदे यांची उपस्थिती होती. संगम येथे आयोजित कार्यक्रमात , परळी तालुक्यातील कर्तव्यदक्ष तलाठी अर्चना गोरे यांनी आपली सेवा परळी तालुक्यातील कौडगाव घोडा, कौडगाव साबळा, बेलंबा दाउतपूर आधी गावामध्ये तर परभणी जिल्ह्यातील सेलु, पिंपरी बुद्रुक ,वरूड नरसिंह आदी ठिकाणी सेवा केली आहे. व कर्तव्यदक्ष तलाठी मोनिका चव्हाण यांनी परळी तालुक्यातील गोवर्धन हिवरा ,पिंपरी बुद्रुक, जवळगाव, खामगाव ,पाडोळी, औरंगाबाद ,तपोवन, तसेच वडगाव दादाहारी ,दगडवाडी ,सेलू लोणी आदी गावांमध्ये आपली सेवा करत आहेत या कार्याची दखल घेऊन राज्य स्तरीय जिजाऊ रत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी केले तर सूत्र संचालन बा.सो.कांबळे यांनी केले. आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत जनाई कोकाटे यांनी केले. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे