चार दिवसाच्या अंतरात परळीत दुसरी नवजात नकोशी ला कचरा डेपो जवळ फेकले

मुलीचा तिरस्कार 

बीड/परळी वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क – चार दिवसांपूर्वीच परळी शहरात मालेवाडी रस्त्यावर एका नकोशील पोत्यात गुंडाळून फेकण्यात आले होते. तिच्यावर उपचार चालू असतानाच (दि. 11 ) रोजी  नंदागौळ रोडवरील न.प. कचरा डेपोजवळ नवजात पाच दिवसाच्या बालिकेला फेकून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. लाल रंगाच्या कपड्यात पाच दिवसांपूर्वी जन्मलेले नवजात मुलीस फेकून दिल्या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात पोलिसांच्या फिर्यादीवरून गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

काही वर्षांपूर्वी देशभरात स्त्रीभ्रूणहत्या व गर्भलिंग निदान प्रकरणात बदनाम झालेले परळी शहर आता लागोपाठ दोन -चार दिवसाच्या फरकात दोन नकोशा मुली रस्त्यावर फेकून दिलेल्या आढळून आल्यामुळे आता सर्वत्र चर्चेत आले आहे. गुरुवारी 11 तारखेस परळी नंदागौळ रस्त्यावरील नफा च्या कचरा डेपो जवळ लाल रंगाच्या कपड्यात गोंधळलेले पाच दिवसाची नवजात शिशु आढळून आले आहे. दर नवजात बाळालिकेश उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

परळी शहरातील नंदागौळ रस्त्यावर नगर पालिकेचा कचरा डेपो असून या कचरा डेपोच्या कोपऱ्यावर लाल रंगाच्या कपड्यांमध्ये स्त्री जातीचे नवजात बाळ टाकून दिलेल्या आवस्थेत होते. या रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीस ते आढळून आले .त्याने ही बाब परळी पोलिसांना कळवली .पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नवजात बाळास परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले व तेथून गुरुवारी रात्री अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय शासकीय रुग्णालयात हालविले.

या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात पोलीस आमलदार श्रीकांत राठोड यांनी फिर्याद दाखल केल्यावर अज्ञात व्यक्तीविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .