चित्रपट -नाटक -कलावंत
बीड/परळी वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क -प्रख्यात अभिनेते तथा रंगभूमी महाराष्ट्र राज्य प्रयोग परीनिरीक्षण महामंडळाचे अध्यक्ष विजय गोखले यांचा सत्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा परळी-वैजनाथच्या वतीने करण्यात आला यावेळी शाखा-अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबेजोगाईच्या नाट्यशास्त्र विभाग प्रमुख सौ.संपदाताई कुलकर्णी,नाट्य व्यवस्थापक गुरु वठारे,शैलेश कुलकर्णी,जितेंद्र नव्हाडे,श्रीपाद पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
