सर्व भारतीयांच्या आस्थेचा विषय असलेल्या रामायणामधील अयोध्येतील श्रीराम मंदिरात तब्बल साडे पाचशे वर्षांनी प्रभू श्रीरामांची न्याय व्यवस्थेच्या आदेशानुसार प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्ताने देशभरात एकप्रकारे दिवाळी सारखे वातावरण तयार होत आहे.
व्यापारी बांधवांना विषेश विनंती २१ जानेवारी रोजी योगायोगाने रविवार आहे आणि याच दिवशी शोभायात्रा संपन्न होणार आहे त्यामुळे सर्वांनी शोभायात्रा संपन्न होईपर्यंत व्यवहार स्थगित ठेऊन मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन पंचम ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र परळी वैजनाथ लोकोत्सव समितितर्फे करण्यात आले आहे.
शोभा यात्रा मार्ग : प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसर – नेहरू चौक (तळ) – राणी लक्ष्मीबाई टॉवर – बाजार समिती (मोंढा मार्केट) – अग्रवाल लॉज – बस स्टँड – छत्रपती शिवाजी महाराज चौक
…………………………
महिलांचा मोठा सहभाग
श्री वैद्यनाथ सेवाभावी भजनी मंडळ, संतश्रेष्ठ गुरुलिंग स्वामी महिला भजनी मंडळ, कालिंका महिला भजनी मंडळ, विठाई महिला भजनी मंडळ, आर्य वैश्य महिला मंडळ, डॉक्टर असोसिएशन, श्री हरिहर महिला भजनी मंडळ, कल्याणकारी महिला भजनी मंडळ, इच्छापूर्ती महिला भजनी मंडळ, शिवकन्या स्वामी महिला भजनी मंडळ, श्री जिव्धेश्वर महिला भजनी मंडळ, श्री शंभु महादेव सेवाभावी भजनी मंडळ, श्री शंभु महादेव महिला भजनी मंडळ, अंबिका महिला भजनी मंडळ, योगा समूह, राष्ट्रीय स्वयंसेवक समिती, सुवर्णकार महिला भजनी मंडळ, राधाकृष्ण महिला भजनी मंडळ, श्री मन्मथ स्वामी महिला भजनी मंडळ, श्री शिवशंकर महिला भजनी मंडळ, मुक्ताई महिला भजनी मंडळ, सुर्वेश्वर महिला भजनी मंडळ, जाणिव बहुउदेशीय सेवाभावी संस्था यासंह विविध सेवाभावी संस्था, भजनी मंडळ, गरबा मंडळ, बचत गटातील महिलांचा लक्षणीय सहभाग असणार आहे.
अक्षता वाटपआजवर परळी वैजनाथमधील जवळपास 95% भागात अक्षता वाटप झाले आहे. तर परळी वैजनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वच गावात अक्षता पोहोचल्या आहेत.
