मराठ्यांची मुंबईकडे कूच; सुमारे सहा दिवसाचा प्रवास.

🔸दररोज सकाळी ९ वाजता मुक्कामाच्या ठिकानाहुन निघून टाळ, मृदंग आणि भजनाच्या साथ संगतीने दुपारी १२ वाजेपर्यंत चालायचं. दुपारचं जेवण झाल्यानंतर मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी उपलब्ध वाहनाने प्रवास करायचा. असा दिनक्रम या मुंबई वारी दरम्यान असणार आहे.

अंतरावली सराटी  -मुंबई –मराठा आंदोलक रोज सुमारे 90 किमी अंतर पार करणार असून सहा दिवसात ते मुंबईच्या आंदोलन स्थळी पोहोचतील. मराठा आंदोलकांचा मुंबई येथील आरक्षणासाठीचा शांततामय मार्च 20 जानेवारीपासून सुरू होत असून तो अंतरावली सराटी ते मातोरी, नंतर बारा बाभळी,अहमदनगर, रांजणगाव गणपती,चंदन नगर- खराडी,पुणे , लोणावळा, वाशी आणि मुंबई येथील आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क असा असणार आहे. या एकूणच सहा दिवसातील मुंबईकडे होणाऱ्या कूच चे टप्पे आणि विश्रांतीच्या जागा त्याबरोबरच जेवण खालील ठीकाणी असणार आहे.
🔸२०  जानेवारीला अंतरावली सराटी ते मातोरी हा प्रवास सकाळी ९ वाजता अंतरावलीतून पदयात्रेने सुरु होईल, दुपारी कोळगाव, ता. गेवराई येथे जेवणासाठी ही पदयात्रा थांबेल.यातील पहिला टप्प्याचा मुक्काम मातोरी, तालुका शिरूर येथील जरांगे पाटलांचे मुळगाव येथे होईल.

🔸21 जानेवारी रोजी मातोरी ते करंजी घाट या अंतरासाठी आगेकूच होईल. सकाळी ८  वाजता निघून दुपारी तनपुरवाडी, ता. पाथर्डी येथे जेवणासाठी सर्वजण थांबतील.  रात्रीचा मुक्काम हा करंजी घाट येथील बाराबाभळी  येथे होईल.

🔸 २२  जानेवारी बारा बाभळी ते रांजणगाव साठी सकाळी ८  वाजता निघून दुपारी सुप्पा येथे जेवनासाठी थांबेल. रात्रीचा मुक्काम रांजणगाव गणपती येथे होईल.

🔸 23 जानेवारी रोजी रांजणगाव ते चंदन नगर, खराडी बायपास सकाळी ८  वाजता निघून दुपारी कोरेगाव भीमा येथे जेवणासाठी थांबतील. रात्रीचा मुक्काम चंदन नगर, खराडी बायपास.
🔸 २४  जानेवारी खराडी बायपास ते लोणावळा या टप्प्यासाठी यात्रा सुरू होईल. चंदन नगरहून सकाळी ८  वाजता निघून दुपारी तळेगाव येथे जेवणासाठी थांबतील. रात्रीचा मुक्काम हा लोणावळा येथे होईल.

🔸२५  जानेवारी लोणावळा ते वाशी नवी मुंबई लोणावळ्यातून सकाळी आठ वाजता निघून दुपारी पनवेल येथे जेवणासाठी थांबेल रात्रीचा मुक्काम वाशी नवी मुंबई येथे होईल.

🔸 26 जानेवारी रोजी वाशी ते आझाद मैदान साठीचे आगे कूच होईल, वाशी इथून सकाळी ८  वाजता निघून चेंबूर येथून पदयात्रा आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क येथे उपोषणासाठी पोहोचेल.
आंदोलन नेमके कुठल्या स्थळी होईल हे अद्याप ठरवले नसून ते ऐनवेळी जाहीर केले जाणार आहे. यासाठी दोन मैदानावर परवानगी घेण्यात आली असून मुंबईतील आझाद मैदान आणि शिवाजी पार्क या दोन ठिकाणाची निवड झालेली आहे.
या सगळ्या सहा दिवसाच्या प्रवासात दररोज सकाळी पदयात्रा सुरू झाल्यानंतर ९  वाजे पर्यन्त  अंतर कापले जाईल. तर दुपारचे जेवण झाल्यानंतर पुढील मुक्कामापर्यंत प्रवास वाहनाने केला जाणार आहे. दररोज साधारण 80- 85 ते 90 किलोमीटरचा टप्पा पार करत रस्त्यातील गावाबाहेर मुक्काम केला जाणार आहे.