रामभक्तांचा उत्साह शिगेला,

लोकोस्तवाच्या शोभायात्रेत हजारो नागरिक,महिला सहभागी

बीड/परळी वैजनाथ- एम एन सी न्यूज नेटवर्क- सुमारे पाचशे वर्षा नंतर अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना २२ जानेवारीला होत आहे. या अनुषंगाने ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ येथे लोकोत्सव समितिच्या वतीने भव्य शोभा यात्रा रविवारी (ता.२१) सकाळी १० वाजता प्रभू श्री वैद्यनाथ मंदिर परिसरातून काढण्यात आली. शोभायात्रेत मंत्री धनंजय मुंडे व माजीमंत्री पंकजा मुंडे व संपूर्ण परळीकर लहानमुले, महिला भगिनींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

देशभरातील सर्व भारतीयांच्या श्रद्धेय आणि आस्थेचा विषय असलेल्या प्रभू श्रीरामाची अयोध्येतील श्रीराम मंदिरात तब्बल पाचशे वर्षांनी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्ताने देशभरात एकप्रकारे दिवाळी सारखे वातावरण तयार होत आहे. या निमित्ताने शहरात येथील लोकोत्सव समितीच्या वतीने रविवारी (ता.२१) भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या शोभायात्रेत शहर व परिसरातील रामभक्त, महिला भगिनी,तरुण, तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रेत भगवे झेंडे, रथामध्ये राम,लक्ष्मण, सिता यांच्या वेशभूषा केलेली मुले व महिला विशेष वेशभूषेसह सहभागी झाल्याने सर्वांचे आकर्षक ठरले होते. यावेळी रामभक्तांनी जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, चा जयघोषाने परिसर दणाणून निघाला होता. युवक मंडळीच्या लैझिमने सर्वांचे लक्ष वेधले. तर युवक मंडळी डिजेच्या तालावर थिरकले.

शहरातील अनेक महिला मंडळे भजनी मंडळे या शोभा यात्रेत सहभागी झाल्याने महिलांनी भगव्या रंगाच्या साड्या तसेच कलश घेवून व भजने गात सहभागी झाल्या. संपूर्ण परळीकरांनी आपापल्या घरावर प्रभु श्रीरामाचे फोटो असलेले भगवे ध्वज, भगव्या पताका, घरावर विद्युत रोषणाई केली. तर शोभायात्रेच्या मार्गावर स्वतः व्यापारी बांधवांनी स्वःखर्चाने भगव्या पताक्यांनी रस्ते सजवले तसेच रविवारी (ता.२१) सकाळी शहरातील अनेक मार्गावर रांगोळी काढण्यात आलेल्या होत्या. शोभायात्रा संपेपर्यंत शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून संपूर्ण परिवारासह सहभागी झाले होते.

शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच ऐवढ्या मोठ्या संख्येने महिला व नागरिक शोभायात्रेत सहभागी झाले होते. इतक्या मोठ्या संख्येने महिला मुलं नागरिक रस्त्यावर येण्याची पहिलीच वेळ असल्याचे अनेक ज्येष्ठ नागरिक यावेळेस बोलून दाखवत होते. प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना च्या रामभक्त आज मोठ्या संख्येने आणि उत्साहाने या लोकसवाद सहभागी झाले होते.

🔷 शोभा यात्रा मार्ग : प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसर – नेहरू चौक (तळ) – राणी लक्ष्मीबाई टॉवर – बाजार समिती (मोंढा मार्केट) – महर्षी वाल्मिकी चौक – बस स्टँड – छत्रपती शिवाजी महाराज चौक

🔸प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर
◆ नगरपालिकेने शहरांत विविध ठिकाणी करणार लायटिंग केली तसेच शहरात विशेष स्वच्छ मोहीम राबविली.
◆ वैद्यकीय इमर्जन्सी विचारात घेता ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात यंत्रणा सज्ज होती.
◆ सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनही सुसज्ज, बी एस एफच्या ३ कंपन्यांसह तगडा बंदोबस्त होता.
◆ जागोजागी रामभक्तांनी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी केली तसेच ठिकठिकाणी खिचडी (डाळ / साबुदाणा), पाणी, फळवाटप तसेच राजगिरा लाडू सोबत विविध खाद्यपदार्थ प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.