श्री काळाराम मंदिर
बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क – दि .22 – अयोध्येत श्रीरामलल्लांची प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात राममय वातावरण झाल्याचे बघायला मिळत आहे.याच पार्श्वभूमीवर परळीतील अंबिका भजनी मंडळाच्या वतीने मकर संक्रांत हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने अंबेवेस येथील श्री काळाराम मंदिर येथे राम लक्ष्मण सीता यांचा जिवंत देखावा सादर केला.
अंबिका भजनी मंडळ हे विविध धार्मिक उपक्रमात अग्रेसर असलेले भजनी मंडळ म्हणून ओळखले जाते. श्रीराम प्रभूंच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर या मंडळांने राम लक्ष्मण सीता यांचा जिवंत देखावा साकारला होता.या ठिकाणी महिला, नागरिक, रामभक्त देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.यावेळी अंबिका भजनी मंडळातील सदस्य,महिला यांची उपस्थिती होती.