श्रमाचा गौरव -मोदींच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अयोध्या-प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर पंतप्रधान राममंदिर परिसरातील कुबेल टिला येथे गेले. या टेकडीवरील शिवमंदिरात मोदींनी पूजा केली आणि जटायूच्या मूर्तीचे अनावरण केले. पंतप्रधानांनी यावेळी राममंदिराच्या बांधकामात सहभागी मजूर, अभियंते यांची भेट घेत संवाद साधला. मोदींनी या श्रमिकांवर पुष्पवृष्टी करत त्यांच्या योगदानाबद्दल आभार मानले. मोदींच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
