उत्कृष्ट व दर्जेदार विकासकामे करणे ही सर्वांचीच जबाबदारी – धनंजय मुंडे

🔷 शिरूर कासार पंचायत समितीच्या इमारतीचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण

बीड/शिरूर कासार (दि. 23) – बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील पंचायत समितीच्या उभारण्यात आलेल्या नवीन इमारतीचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट व दर्जेदार विकासकामे करणे ही सर्वांचीच जबाबदारी असून या प्रशासकीय इमारतींमध्ये आपली कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना या वास्तू आपल्या वाटाव्यात, असे काम करावे, अशी अपेक्षा धनंजय मुंडे यांनी बोलताना व्यक्त केली.

यावेळी शिरूर कासार तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींचे वसतिगृह, कृषी कार्यालय यांसह अन्य शासकीय इमारती (56 कोटी 66 लाख), विविध रस्त्यांची कामे (22 कोटी 50 लाख) अशा सुमारे 79 कोटी रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमास आष्टी पाटोदा शिरूरचे आमदार बाळासाहेब आजबे, रामकृष्ण बांगर, दशरथ वणवे, डॉ.शिवाजी राऊत, सतीश शिंदे, गहिनीनाथ सिरसाट, विश्वास नागरगोजे, दीपक घुमरे, नवनाथ ढाकणे, अक्षय जाधव, सौ. प्रियांका केदार, बाबुराव केदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, तहसीलदार विपीन पाटील, गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांसह आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अविनाश पाठक यांनी केले. तर आ.बाळासाहेब आजबे काका यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.