◼️🔷 उच्चन्यायालय निरीक्षण/ माध्यम
कोलकाता- (वृत्तसंस्था) पत्रकारांना आपल्या कामात मोठी जोखीम घेऊन आपले काम करावे लागते. आपल्या कामात वार्तांकनासाठीचे सर्व प्रयत्न करण्यासाठी त्यांचे संरक्षण झाले पाहिजे, पत्रकार आणि माध्यमाचे स्वातंत्र्य लोकशाहीसाठी अत्यावश्यक आहे असं निरीक्षण कोलकत्ता उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
एबीपी आनंदा या टीव्ही चॅनल चे रणजीत दास उर्फ मोहनदास हे पत्रकार आहेत. त्यांनी गौण खनिज, अवैध उत्खनन याचे व्हिडिओ काढले होते. यानंतर त्यांच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल होत आहेत. आपल्याला खोट्या गुन्ह्यात गुंतवून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं म्हणत त्यांनी आपल्या अटकपूर्व जामीन साठी न्यायालयात अर्ज केला. दरम्यान सरकारी वकीलानी त्यांना जामीन देण्यास विरोध करताना रणजीत दास हे परिसरातील अनेक वेगवेगळ्या व्यक्तीकडून पैसे उकळत आहेत, असा युक्तिवाद केला. कोर्टाने जामीन मंजूर करताना पत्रकाराच्या स्वतंत्र्याचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे मत यावेळी व्यक्त केले.
……………………………………………………………………………..
🔷 पत्रकारांना त्यांचे पत्रकारितेतील कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे आवश्यक आहे. पत्रकार हा माध्यमाचाच भाग असून पत्रकारांना धाक दाखवून वृत्तपत्र स्वातंत्र्य राखले जाऊ शकत नाही.
देबांगसू बसाक व मो. शब्बर रशिदी
न्यायमूर्ती