चिखली जालना हायवे वर अर्धवट जळालेले तरुणीचे प्रेत

क्राईम/जबरी अत्याचार-मारहाण करुन जीवंत जाळले

जालना/ देऊळगाव राजा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन च्या हद्दीत येणाऱ्या चिखली- जालना हायवे वरील एका बंद हॉटेलच्या मागे अज्ञात तरुणीवर अज्ञाताने  अत्याचार करून जिवंत जाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिखली- जालना हायवे वरील एका बंद हॉटेलचे मागच्या बाजूस, अंढेरा शिवरातील कोपऱ्याजवळ एका अज्ञात तरुणीवर अज्ञाताने अत्याचार व जबरी मारहाण करून तिला जिवंत जाळल्याचा प्रकार आढळून आला आहे. या प्रेताजवळच तूप, नारळ, वात आदी वस्तू दिसून आल्या आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गजानन वाघ यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.