बीड येथील चित्रकाराचा अयोध्येत सन्मान

कला विश्व / कलावंत

बीड/गेवराई/- मुंबई मध्ये आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून जिल्ह्याचे नाव लौकिक वाढविणारे चित्रकार संजय निवृत्तीराव राऊत यांना नुकत्याच आयोध्येत 14 ते 17 जानेवारी दरम्यान विविध विषयावर चित्र रेखाटण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.यावेळी राम कथेवर आधारित लाईव्ह पेंटिंग करण्यात आली. या प्रदर्शनास भाजपा खासदार तथा चित्रपट अभिनेत्री हेमा मालिनी यांनी 21 जानेवारी रोजी भेट देऊन राऊत यांच्या कलेचे कौतुक केलं. दरम्यान चित्रकारांना प्रशस्तीपत्र आणि 50 ग्रॅम चांदीचे नाणे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

संजय राऊत यांचे मुंबईतील सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी व येथेही अनेक प्रदर्शना झाली आहेत. अयोध्येत चित्र काढण्यास निमंत्रित केल्याबद्दल संजय राऊत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.