बीड/परळी वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क -दि.२७ मिलिंद माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री.कदरकर सर,उप प्राचार्य श्री.शेख इरफान सर, पर्यवेक्षक श्री.धायगुडे सर यांच्या हस्ते फित कापून आनंद नगरी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नाथ शिक्षण संस्थेचे समन्वयक तथा यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.अतुल दुबेसर यांनी आनंद नगरी कार्यक्रमास भेट देऊन सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्य विकसित व्हावेत या हेतूने प्रतिवर्षी आनंद नगरी-‘खरी कमाई’ हा उपक्रम राबविण्यात येतो. यात ५ वी ते १२ वी वर्गातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. घरगुती स्वादिष्ट पक्वान्नांचा आस्वाद विद्यार्थ्यांसह अध्यापक वर्गानेही घेतला. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. परीक्षणाचे कार्य सौ.बनसोडे,सौ.बीडवे,सौ.भोसले,प्रा.सौ.गित्ते मॅडम व पवार मॅडम यांनी केले तर नियोजन क्रिडाशिक्षक श्री.शेप सर यांनी केले.