निवड
बीड/परळी वैजनाथ-एम एन सी न्यूज नेटवर्क दि.३०
येथील कौलूघाना तेली सहकारी संघ मर्यादित परळी वैजनाथच्या संचालक मंडळाची मंगळवारी (ता.३०) निवड करण्यात आली चेअरमनपदी सुरेश लांडगे, व्हाईस चेअरमन पांडुरंग आप्पा कोल्हे तर सचिवपदी विठ्ठल आप्पा चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शहरातील कौलूघाना तेली सहकारी संघाच्या कार्यकारिणीची मुदत संपल्याने नियमानुसार नुतन कार्यकारिणी निवडण्यासाठी निवडणूक अधिकारी श्री चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सभासदांनी चेअरमनपदी सुरेश लांडगे, व्हाईस चेअरमन पांडुरंग आप्पा कोल्हे, तर सचिवपदी विठ्ठल आप्पा चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर नुतन कार्यकारिणी मध्ये संचालक मन्मथ उदगीरकर, सुर्यकांत व्यवहारे, उमाकांत उदगीरकर, संगमेश्वर फुटके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर सदस्यांनी सुरेश लांडगे व नुतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. बैठकीस संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते.