अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके,औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
बीड /परळी-वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क दि. ३० परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने मूकनायक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन दि. 31 जानेवारी रोजी चेमरी रेस्ट हाऊस हॉल येथे सकाळी 10 वा.करण्यात आले आहे. पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परळीतील निर्भीड पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास परळी शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मूकनायक पुरस्कार वितरण समिती परळीच्या वतीने करण्यात आले आहे.
मूकनायक पुरस्कार 2024 वितरण सोहळ्यास उद्घाटक म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई विभागाच्या चेतना तिडके तर विशेष अतिथी म्हणून परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये, परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे औष्णिक विद्युत केंद्र परळीचे उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार, डॉ. आरशद शेख, नायब तहसीलदार अण्णा वंजारे, सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, औष्णिक विद्युत केंद्राचे कल्याण अधिकारी शरद राठोड, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक सिने अभिनेता दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्कार साहित्यीक पत्रकार रानबा गायकवाड( दै.सम्राट), उत्कृष्ट जेष्ठ संपादक पुरस्कार राजेश साबणे ( दै. परळी प्रहार), उत्कृष्ट संस्कृतिक वार्ता पुरस्कार प्रा.रवी जोशी ( दै.पुढारी), रिपोर्टर ऑफ द इयर पुरस्कार धनंजय आरबुने ( दै.पुण्यनगरी), उत्कृष्ट शोध वार्ता पुरस्कार प्रा. प्रवीण फुटके ( दै.सकाळ), उत्कृष्ट सामाजिक वार्ता पुरस्कार जगदीश शिंदे ( दै. गांवकरी, संकेत), तर उत्कृष्ट युवा संपादक पुरस्कार नितीन ढाकणे (दै.अतुल्य महाराष्ट्र) यांना मूकनायक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह व प्रत्येकी 1 हजार रुपये रोख असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमास परळी शहर तालुक्यातील पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मूकनायक पुरस्कार वितरण समितीचे मुख्य संयोजक भगवान साकसमुद्रे, उपाध्यक्ष ओमप्रकाश बुरांडे, सचिव परमेश्वर मुंडे, कार्यकारी सदस्य सय्यद अफसर, लक्ष्मण वैराळ आदींनी केले आहे.