पंडितभाऊ दाभाडे यांना राज्यस्तरीय टि. एम. जी. अनमोल सामाजिक कलागौरव पुरस्कार जाहीर

निवड/पुरस्कार 
————————————
पुणे- राज्यात सामाजिक कार्याने नाव लोकीत असलेले बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक सामाजिक राजकीय आणि शैक्षणिककार्याचा ठसा महाराष्ट्रात उमटला असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद आणि टि.एम.जी.क्रियेशन्स यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त टि एम जी गौरव सोहळा कार्यक्रम संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांना २०२४ या वर्षाचा अत्यंत मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय टि.एम.जी.अनमोल सामाजिक कार्यगौरव पुरस्कार जाहीर झाला असून बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांना रविवार दि ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबई येथील मुंबई मराठी पत्रकार संघ पत्रकार भवन.२ मजला (वातानुकूलित) आझाद मैदान च्या बाजूला महापालिका मार्ग सी एस टी एम मुंबई येथे होणार आहे. या कार्यक्रमास  देवेंद्र भुजबळ संचालक माहिती विभाग महाराष्ट्र राज्य . जयवंत वाडकर प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सुनिता नाशिककर पोलीस उपअधीक्षक डॉ राजेश येवले शिक्षणतज्ञ तथा अध्यक्ष बोर्ड ऑफ स्टडीज इंग्लिश. झाकीर खान. चित्रपट टीव्ही हास्य अभिनेते डॉक्टर जालिंदर महाडिक विशेष अधीक्षक महाराष्ट्र राज्य. अंकुर वाढवे चित्रपट व टीव्ही अभिनेते. मोहन बडगुजर. अध्यक्ष आयकॉन फाउंडेशन इंडिया तथा ज्येष्ठ समाजसेवक. कुणाल भोईर ज्येष्ठ उद्योगपती. अमृता उत्तरवार. सिम्मी (शकीला) शेख. संचालिका रेट प्लेनेंट कंपनी या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांना शाल श्रीफळ आणि ट्राॕफी व पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन सौ सलमा एन खान (सहसंस्थापिका) कलागौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद व डॉ शैलेंद्र पवार (प्रमुख समन्वय) टि एम जी महागौरव सोहळा यांनी केले आहे
बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांच्या पुरस्कार सोहळा कार्यक्रमाला मुंबई येथे बहुजन जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्ये त उपस्थित राहावे असे आव्हान बहुजन जनता दल कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी केले आहे