तमिलागा वेत्री कझम; तामीळ सुपर स्टार विजय थलपती चा नवा राजकीय पक्ष

सिने कलावंत  आणि राजकारण

चेन्नई –येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अभिनेता विजयने तामिळनाडूमध्ये राजकीय पक्ष सुरू केला आहे. त्यांनी पक्षाला ‘तमिलागा वेत्री कझम’ असे नाव दिले आहे. त्याचा मराठी अर्थ तामिळनाडू विजय पार्टी असा होतो.चित्रपटात काम करत  राजकारणात येऊन तामिळनाडूच्या जनतेची सेवा करणार असल्याचेही विजयने सांगितले.मात्र, त्याने लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. माध्यमाना बोलताना विजय म्हणाला की, आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. पक्षाच्या बैठकीत आम्ही हा निर्णय घेतला आहे.
विजयचे तामिळनाडूमध्ये प्रचंड चाहते आहेत. त्याचे इन्स्टाग्रामवर 10.5 दशलक्ष आणि ट्विटरवर 4.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तो अनेकदा गरजू लोकांना मदत करताना दिसतो.

सर्वाधिक मानधन  बालकलाकार म्हणून सुरू झाली कारकीर्द विजयचे खरे नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे.विजय हा सर्वाधिक मानधन घेणारा तमिळ अभिनेता आहे. मानधणा च्या   बाबतीत त्याने ‘दरबार’साठी 90 कोटी रुपये घेतलेल्या रजनीकांतलाही मागे टाकले आहे.
तो चाहत्यांमध्ये थलपथी म्हणून प्रसिद्ध आहे. विजयचे वडील एसए चंद्रशेखर हे कॉलिवुडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. विजयने त्याच्या वडिलांच्या 15 चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी 6 चित्रपटांमध्ये तो बालकलाकार म्हणून दिसला आहे.विजय हा रजनीकांत यांचा मोठा चाहता आहे. वयाच्या 18 व्या वर्षी विजयने नलय्या थेरपू या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात त्याचे नाव विजय होते. या नावाने त्याने 8 चित्रपटांमध्ये काम केले आहे. यानंतर विजयने एकापाठोपाठ तीन हिट चित्रपट देऊन सर्वांची बोलती बंद केली. विजयने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत सुमारे 65 चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी बहुतांश चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले आहेत.