ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळा बांगर, शहराध्यक्ष सचिन जाधव यांच्या उपस्थितीत परळीत झाला प्रवेश
🔷अनेक वाहनांचा ताफा, सोबतीला शेकडो कार्यकर्ते
बीड/परळी वैद्यनाथ (दि. 04) – बीड येथील सामाजिक कार्यकर्ते रोहन गायकवाड यांनी त्यांच्यासोबतच्या असंख्य युवा कार्यकर्त्यांच्या सोबत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर आबा चव्हाण यांच्या हस्ते, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड व युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळा बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
बीड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन जाधव यांच्या पुढाकारातून आज रोहन गायकवाड यांनी असंख्य युवा कार्यकर्त्यांना सोबतीला घेऊन, परळी येथील ना.धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात हा पक्ष प्रवेश घेतला. रोहन यांनी यावेळी अनेक गाड्यांचा मोठा ताफा सोबतीला आणून असंख्य युवा कार्यकर्त्यांसोबत शक्तिप्रदर्शन केले.
रोहन गायकवाड यांचे ऍड.राजेश्वर आबा चव्हाण, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, युवक अध्यक्ष बाळा बांगर यांनी पक्षाचा गमजा देऊन स्वागत केले, तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी बीडचे शहराध्यक्ष सचिन जाधव यांच्यासह सोफवान खान, रवी आघाव, सोनू पवार, अशोक जावळे आदींची उपस्थिती होती.
