बीड गेवराई परिसरात भूगर्भातून गुढ प्रचंड आवाज,

🔷  नागरिकांत घबराट ,

बीड: गेवराई- समाज माध्यमातून गेवराई परिसरात मोठे आवाज होऊन भूकंम्प झाल्याचा ऑल क्येक्स या वेब साईट वरनोंद झाल्याचा स्क्रीन शॉट फिरत होता. अनेकांनी एकमेकांना विचारात हे खरेच आहे की नाही याची माहिती घेतली. दरम्यान बीड शहरांत मगळवारी रात्री ८ वाजून १५ ते २५ मिनिटाच्या दरम्यान संपूर्ण बीड शहर मोठ्या स्वरूपातील गूढ आवाजाने हादरले. हंस आवाज सुमारे चार ते पाच किलोमीटर परिसरात ऐकायला मिळाला. आवाज आणि जमिनीत जाणवलेली कंपन हादरा कशाचा असेल, याबाबत लोक घाबरून गेले.

मिळालेल्या आधीक माहिती नुसार भूस्तरातील क्रियेमुळे असा आवाज असावा, परंतू भूकंपसदृष्य नसल्याचे संबंधित विभागाने सांगितले. तर भूकंपाची कुठेही नोंद नसल्याने नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे तहसीलदारांनी सांगितले.

शहरात रात्री ८:२० वाजता अचानक मोठा आवाज झाला आणि त्याची मोठ्या प्रमाणावर कंपणे जाणवली. . घराच्या खिडक्या, दरवाजे हादरले तर हलकी कमी वजनाची घरातील भांडी प्लास्टिक  खाली पडले. मोठा आवाज झाल्याच्या पोस्ट सोशल मिडीयावर फिरल्या. प्रशासनाने कारण कळवावे, अशाही पोस्ट पडत होत्या. त्याचबरोबर नागरीक पोलिस, तहसील प्रशासन, जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनशी संपर्क करून विचारणा करत होते. दरम्यान तहसीलदारांनी लातूरच्या भूकंप पुनर्वसन केंद्राला याबाबतमाहिती कळविली आहे