पाणी प्रश्न / उन्हाळ्यात पाणी गळती/
🔷 पाणी पुरवठा प्रभावित
अकोला- शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी खडकी परिसरातील महापालिकेच्या ट्रान्सपर स्टेशन रस्त्यालगत गळतीमुळे शहराचा पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे.झाली आहे.
शहराला महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातून २५ एमएलडी आणि ६५ एमएलडी क्षमतेच्या केंद्रातून ९०० मिमी आणि ६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीने पाणी पुरवठा होतो. १९७८ चा दरम्यान ६०० मिमी व्यासाची जलवाहिनी अंथरण्यात आलेली आहे. ही जलवाहिनी आता जिर्ण झाली आहे. परिणामी ही जलवाहिनी अनेकदा फुतुन पाणी गळती चे प्रकार घडले आहेत. बुधवारी दि.७ फेब्रुवारी रोजी खडकी परिसरातील महापालिकेच्या ट्रान्सपर स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ६०० मिमी व्यासाची जलवाहिनी मध्ये गळती सुरू झाल्याची बाब निदर्शनास आली. या लिकेज मधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
पाणी पुरवठा होऊ शकतो प्रभावित
जलवाहिनीवरील गळतीचे प्रमाण लहान आहे की मोठ्या प्रमाणात ही बाब जलवाहिनी उघडी केल्या नंतर स्पष्ट होईल. जर लिकेज लहान स्वरुपाचे असल्यास केंद्रातील पाणी पुरवठा बंद करण्याची गरज भासणार नाही. गळतीचे प्रमाण अधिक असल्यास पाणी पुरवठा बंद करावा लागेल. ६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरुन शहरातील ९ जलकुंभाचा पाणी पुरवठा विस्कळीत होईल.