
लाच/लाच-लुचपत/करप्शन- वाळू
बीड /गेवराई-गेवराई तालुक्यातील गुंजेगाव पाथरवाला येथील गोदावरी नदी पात्रातून वाळू उपसा करून ती वाळू नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे वाहतूक करू देण्यासाठी व कोणतीही पोलिस कारवाई न करण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच मागितली. ही लाच घेताना एका खासगी इसमास रंगेहाथ पकडले तर लाच मागणाऱ्या पोलिस हवालदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मंगळवारी (दि ८) रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली होती. बुधवारी सकाळी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी मुकेश काशिनाथ गुंजाळ या पोलिस हवालदारास निलंबित केले. तर प्रमोद विठ्ठलराव कोठेकर (वय २७, रा. गेवराई) असे लाच स्वीकारते वेळी पकडलेल्या खासगी इसमाचे नाव आहे. या दोघांविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

