चौधरी चरण सिंह, पी. व्ही. नरसिंह राव, डॉ. स्वामीनाथन यांना ‘भारतरत्न’

एका वर्षात विक्रमी पाच जणांना सर्वोच्च सन्मान

नवी दिल्ली : मोदी सरकारने चौधरी चरण सिंह, पी. व्ही. नरसिंह राव हे दोन माजी पंतप्रधान आणि हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन या तिघांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ (मरणोत्तर) जाहीर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी यासंदर्भात घोषणा केली. सर्वच राजकीय पक्षांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

गेल्या काही दिवसांत मोदी सरकारने या आधी बिहारचे दिवंगत मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. एकाच वर्षात ५ जणांना भारतरत्न देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आमच्या सरकारचे सौभाग्य आहे.

पंतप्रधानांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चौधरी चरण सिंह, पी. व्ही. नरसिंह राव, डॉ. स्वामीनाथन देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना हा सन्मान देण्यात येत आहे. भारतरत्नने  सन्मानित करण्यात येणार आहे.