🔷 घटनास्थळी गावठी कट्ट्यासह तलवार सापडली
अहमदनगर- अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड भागातील प्रसिद्ध मिठाई विक्रेते बन्सी महाराज मिठाईवाले या दुकानाचे मालक धीरज जोशी यांच्यावर काल (दि १०) रोजी रात्री १०च्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. मिठाई व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याच्या या घटनेने अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली असून हल्ल्यात धीरज जोशी हे गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बन्सी मिठाईचे धीरज जोशी यांच्यावर हल्ला का झाला याचे कारण अस्पष्ट असून घटनेस्थळी तोफखाना पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. नगर शहरातील गुलमोहर रोड परिसरातील असलेल्या किर्लोस्कर कॉलनीमध्ये दोन अज्ञात लोकांनी बन्सी महाराज मिठाईवालेचे संचालक धीरज जोशी यांच्या वर दोघा अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला तलवारीने केला गेला आहे. या हल्ल्यात धीरज जोशी हे गंभीर जखमी झाले असून हल्ल्याच्या ठिकाणी एक तलवार आणि गावठी पिस्टल सापडून आले आहे. मात्र या हल्या मागचे कारण अध्याप कळाले नसून शहरांतील तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहेत. अधिक तपास करत आहेत.