🔷 राजकारण /राजकीय
मुंबई-राष्ट्रवादी पक्षाच्या एका कार्यक्रमात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्टार प्रचारक म्हणून राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
‘मुंडे वक्तृत्व कौशल्य लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी उपयुक्त ठरेल. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने गटाने सध्या तरी भाजप सोबत राहण्याचा निर्णय केलेला आहे. महाराष्ट्रातील – ४८ जागांपैकी ४५ जागा जिंकून पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्याचा संकल्प अजित पवार यांनी सोडला आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाच्या अधिक जागा विजयी करण्यासाठी कामाला लागली आहे