नागपूर यवतमाळ नांदेड जिल्ह्यांना गारपिटीचा तडाखा

संग्रहित छायाचित्र

अवकाळी गारपीट/ हवामान

नागपूर-मराठवाड्यातील नांदेड आणि विदर्भातील नागपूर यवतमाळ या जिल्ह्यातील काही तालुक्यांना रविवारी गारपिटीचा मोठा तडाखा बसला त्यात वीज कोसळून एक जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

रविवारी नांदेड जिल्ह्यातील भोकर, किनवट, मुदखेड, उमरी, हिमायतनगर या तालुक्यात विजेच्या लखलखाट आणि ढगांच्या कडकडाटासह वादळीवाऱ्यांना सुरुवात झाली.रविवारी दुपारी चार ते पाच च्या सुमाराला गारपिटीने या भागात धुडगूस घातला आणि पिकांंचं मोठं नुकसान केले.

मुदखेड तालुक्यातील पिंपळकोठा येथे वीज बसवून एक जण ठार झाला ठार झालेल्या व्यक्तीचे नाव दत्त वाघमारे असं असल्याची माहिती मिळत आहे तो आपल्या शेतातून घराकडे परतत होता.

येत्या 48 ते 72 तासात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात काही ठिकाणी गारपीटीची शक्यता हवामान विभागाने  दिली आहे.