रस्ते अपघातात डॉ. वाल्मीक मुंडे यांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

बीड /परळी वैजनाथ- परळी शहरातील डॉ. वाल्मीक मुंडे यांचे (दि.11) रविवार मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान परळी येथील अंबाजोगाई रोड ते बीड रोड जोडणाऱ्या बायपास मार्गावरील कामसुरू असलेल्या पुला जवळ भरावारून चारचाकी गाडी खाली गेल्याने झालेल्या अपघातात  मृत्यू झाला तर गाडी चालवणारे डॉ. गंभीर जखमी झाले आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी की, ही घटना परळी तालुक्यातील टोकवाडी ते जिरेवाडी या रस्त्यावर एक नाल्याच्या कामाच्या जागी सदर अपघात घडला. नाल्यात पाणी वाहून नेण्यासाठी मोठे सिमेंट पाईप टाकले असून मुरूम ही अस्ताव्यस्त पडला आहे. मात्र येथे काम चालू आहे असा कुठलाही फलक नसल्याने अपघात घडला असल्याची मोठी चर्चा आहे.
डॉ.  वाल्मीक मुंडे परळी तालुक्यातील रुग्णप्रिय डॉ होते. त्यांचा अपघाती निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ,बहिणी,भावजय,पुतणे,भाच्छे असा त्यांचा परिवार आहे.