सिरसाळा ग्रामपंचायत हद्दीतील रस्ता व ओपन पेस मधील अतिक्रमण; पंचायत समिती कार्यालयाच्या लेखी आश्वासनानंतर उत्तम माने यांचे धरणे आंदोलन मागे

बीड/परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क – सिरसाळा ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक एक मधील रस्ता व ओपन पेस मध्ये असलेली अनाधिकृत अतिक्रमणे तात्काळ काढावीत या मागणीसाठी सोमवार दि. 12 फेब्रुवारी 2024 पासून परळी पंचायत समिती कार्यालासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. परंतु परळी पंचायत समिती कार्यालयाच्या लेखी आश्वासनानंतर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव उत्तम माने यांनी धरणे आंदोलन मागे घेतले आहे. दरम्यान या प्रकरणी प्रशासनाने लवकरात कारवाई केली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही माने यांनी दिला आहे.

सिरसाळा येथील गट क्र.01 या ठिकाणी होत असलेल्या अतिक्रमण बाबत ग्रामविकास ग्रा.प. सिरसाळा, गटविकास अधिकारी प.स परळी वै.,उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रा.प) जि.प.बीड यांना रस्ता व ओपन स्पेस मध्ये होत असलेल्या अतिक्रमण बाबत वेळोवेळी कळविण्यात आले होते. परंतु ग्रामविकास अधिकारी ग्रा.प. सिरसाळा जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे वेळोवेळी दिसून येत होते. दि. 11 फेब्रुवारी 2024 पर्यंत ग्रामपंचायत अधिनियम कायद्याप्रमाणे अतिक्रमण करून बांधण्यात आलेली बांधकामे पाडून ओपन स्पेस व रस्ता खुला करावा या मागणीसाठी दि. 12 फेब्रुवारी 2024 पासून पंचायत समिती कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन उत्तम माने यांनी सुरू केले होते. परंतु पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने ग्रामपंचायत सिरसाळा ता. परळी वै यांना पत्र देऊन ग्रामपंचायत सिरसाळा हदीतील गट क्रमांक 01 मधील अतिक्रमणा बाबत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम-1958 मधील कलम 52 व 53 व प्रचलित शासन सुचनानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्या बाबत संदर्भ क्रमांक 07 अन्वये कळविण्यात आलेले आहे. गट क्रमांक 01 मधील रस्ता व ओपन स्पेस खुला करून देण्याच्या संदर्भात ग्रामपंचायतकडे उपलब्ध असलेल्या अभिलेख व इतर कागदपत्राचे अवलोकन करून सहाय्यक पोलीस निरिक्षक पोलीस ठाणे सिरसाळा यांच्याकडे पोलीस संरक्षणाची मागणी करून तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे या कार्यालयास कळविलेले आहे.

ग्रामपंचायत स्तरावरील अतिक्रमाण काढणे संदर्भात प्रशासकीय बाबी ची पुर्तता झाल्यानंतर अतिक्रमण काढणे बाबतची कार्यवाही तात्काळ करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र परळी पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी शिवाजी मुंडे, विस्तार अधिकारी भताने , दराडे यांनी उत्तम माने यांना दिले. यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते श्रीराम मुंडे सामाजिक कार्यकर्ते प्रा. संपत वाघमोडे, ज्ञानेश्र्वर फड, विष्णू रोडगे, बबन कसबे, चैतन्य मुंडे, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.