मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात; दोन ठार

समृद्धी महामार्ग -अपघात –

जालना नजीक समृद्धी महामार्गावरील घटना
जालना : नागपूर-मुंबई या समृध्दी महामार्गावरील अपघातात अपघाताची मालिका सुरूच आहे . भरधाव वाहन चालून अनेक अपघात होत आहेत. एक रुग्णवाहिका सायन हॉस्पिटल मुंबई येथून मृतदेह घेऊन उत्तरप्रदेशकडे जात असतान चॅनल नंबर 361 -4 जामवाडी परिसरात सोमवारी (दि. 12) पहाटे अपघात झाला यात रुग्णवाहिका चालक आणि अन्य एकाचा मृत्यू झाला.

सायन हॉस्पिटल मुंबई येथून रुग्णवाहिका (क्र. एमएच ०१, ईएम ३०८४) एक मृतदेह घेऊन उत्तरप्रदेशकडे जात होती. ट्रकला जाऊन धडकल्याने रुग्णवाहिका चालकासह अन्य एकाचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.रुग्णवाहिका आज पहाटे चारच्या सुमारास जालना हद्दीतील जामवाडी शिवारातील चॅनल क्रमांक ३६१.४ जवळ असताना समोर जात असलेल्या ट्रकला (क्र. एमएस ४६, बीयू ४५१०) जाऊन धडकली. या अपघातात
चालक मोहंमद नजीब शेख (३८, उत्तरप्रदेश) याचा जागीच मृत्यू झाला  आहे.   तर मोहंमद सेफ (वय २४), मोहंमद नसीम, मोहंमद इब्राहीम हे गंभीर जखमी झाले.

महामार्ग पोलिस व महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यानी  जखमींना अन्य एका रुग्णवाहिकेतून उपचारासाठी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, मोहंमद सेफ याचाही उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. इतर दोन जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.