
हेरगिरीचा आरोप
नवी दिल्ली- ( वृत्तसंस्था) कतारमध्ये कथीतरित्या हेरगिरीच्या आरोपा खाली भारतातील नौदलाच्या आठ जणांना मृतदं डाची शिक्षा ठोकली होती. या शिक्षेतून आठही अधिकाऱ्यांची मुक्तता झाली आहे. या मध्ये भारतीय मुसध्येगिरीचे सर्वात मोठे यश समजले जात आहे.
काही महिन्याच्या तुरुंगवासानंतर कतारच्या न्यायालयाने कोठडीत असलेल्या सर्व आठ भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांची मुक्तता केली. यापैकी 7 नौदल अधिकारी भारतात परतले आहेत. एकूणच या सर्व प्रकरणात अतिशय गोपनीयता पाळण्यात आली.
दरम्यान अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष धन्यवाद देत आभार मानले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने मध्यरात्री एक निवेदन प्रसारित करून कतार मधील भारतीयांच्या सुटकेची माहिती दिली. या सर्वांना फाशीच्या शिक्षेतून मुक्त करण्याच्या कतारमधील न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

