काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकी दोन्ही चा राजीनामा, चव्हाण समर्थक गटाचे आमदारही भाजपच्या वाटेवर
महिन्याभरात कॉँग्रेसला तीन नेत्यांनी केला रामराम.
मुंबई : राज्यात खळबळ उडवनार राजकारण आणि अकल्पित नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सुमारे दोन वर्षांपासून मागे लागलेला ‘ईडी’च्या चौकशीचा ससेमिरा आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी कथित बिनसलेले संबंध यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसला रामराम करुन राज्याच्या राजकारणात मोठी अकल्पित नाट्यमय भूकंप घडविला. अशोक चव्हाणां या दिग्गज नेत्याच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसणार आहे. त्यांचा राजीनामा म्हणजे एक राजकीय भूकंप मानला जात आहे. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्या पाठोपाठ अशोक चव्हाण यांच्या रूपात हा काँग्रेसला गेल्या महिनाभरात तिसरा झटका बसला आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आगे आगे देखिये होता है क्या’, अशी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चव्हाण यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर काही तासांतच त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा ही राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याकडे पाठविला. चव्हाण यांच्या मागे त्यांचे
अनेक समर्थक आमदार काँग्रेस सोडण्याच्या मनःस्थितीत असल्याची चर्चा राज्यात रंगली आहे . गेल्या महिनाभरात इंदूर येथे
दरम्यान काही दिवसा पूर्वी भाजपच्या नेत्यांची चव्हाण यांनी गुप्त भेट घेतली आणि बंडाची रणनीती ठरल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.
.. .. ………………………………………..
काँग्रेसबद्दल कसलीच तक्रार नाही : चव्हाण काँग्रेसमध्ये असताना मी प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. काँग्रेस पक्षाबद्दल माझी काही तक्रार नाही.
काँग्रेसने मला खूप काही दिले व मी ही काँग्रेससाठी खूप काही केले.
कोणाबद्दल मी तक्रार करणार नाही. वैयक्तिक कोणाबद्दलही माझ्या मनात वेगळी भावना नाही. पुढील राजकीय दिशेबाबत अद्याप मी काहीही निर्णय घेतलेला नाही. याबाबत विचार करून एक-दोन दिवसांत माझी भूमिका स्पष्ट करेन, असे अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावरून सांगितले.