🔷अशोक चव्हाण यांचा भा ज प प्रवेश
जालना /रामेश्वरम धाम/एम एन सी न्यूज नेटवर्क : काँग्रेस पक्षाचे मातब्बर नेते, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याबद्दल एकेकाळी त्यांचे खंदे समर्थक असलेले जालन्यातील भाजपाचे पदाधिकारी विजय कामड यांच्या नेतृत्वाखाली श्रीक्षेत्र रामेश्वरम धाम येथे मंगळवारी ( ता. 13)फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आला.
प. पू. माऊली संध्या दीदीजी यांच्या सुश्राव्य वाणीतून श्री क्षेत्र रामेश्वरम धाम येथे शिव महापुराण कथा सुरू असून या कथा यज्ञ सोहळ्यात जालन्यातील तब्बल साडेसातशे भाविक सहभागी झाले आहेत.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेश सोहळ्याची बातमी कळताच श्री क्षेत्र रामेश्वरम धाम येथे कथा स्थळी परिसरात जल्लोष करण्यात आला. यावेळी विजय कामड,शाम लखोटिया,रमेश सेठी, सुनील लाहोटी,ॲड .जाजू,नंदकिशोर इंदानी,
शिवप्रसाद धुत,श्रीराम काबरा,सत्यनारायण मंत्री,राजेश बन्सल, दत्तात्रय कुलकर्णी, उत्तमचद सोनी,शिवप्रसाद मुंदडा,
श्रीनिवास पोखरीकर ,कपिल साडेगावकर, गणेश जोशी,
सचिन मुद्रगावकर, मनोज कोडगावकर, शाम कुलकर्णी,
केशव गुरु, मनोज देशमुख, अभिजित कुलकर्णी, भानुदासराव कुलकर्णी, श्रृती पोखरीकर,सीमा जोशी, स्नेहलता कामड, प्रमिला मंत्री,वैष्णवी साडेगावकर,शिल्पा कुलकर्णी, मंजिरी देशमुख, भक्ती कुलकर्णी यांच्या सह पदाधिकारी, महिला , कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलतांना विजय कामड म्हणाले, “सबका साथ, सबका विकास” या ध्येयाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाकडून सर्व घटकांना विकासाच्या प्रवाहात आणले जात आहे, भारताची महासत्तेच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने अधोरेखित झाली आहे. त्यांच्या
समवेत आपण अनेक वर्षे काँग्रेस पक्षात काम केले असून त्यांची लोकप्रियता आणि छबी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भाजपला मराठवाड्यात आणखी मोठे बळ प्राप्त होईल. असा विश्वास विजय कामड यांनी याप्रसंगी व्यक्त केला.