मुंबईच्या आकाशात ट्राफिक

हवाई वाहतुक /पर्यटन/प्रवास/ भ्रमंती/तिर्थस्थळे-

🔸 मुंबई विमानतळावर दिवसाकाठी ९०० ते ९५० लॅंडींग आणि टेकऑफ  करत असतात 

मुंबई : मुंबई विमानतळावर दिवसाकाठी ९५० च्या आसपास विमानांची लॅंडींग आणि टेकऑफ  करत असतात . देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ अशी ओळख असेलल्या, मुंबई विमानतळावरील विमान वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कंपन्यांनी आपल्या सेवांमध्ये कपात करावी, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. यामुळे किमान ४० विमान सेवा रद्द होणार असल्याची माहिती आहे. यामुळे उपलब्ध विमानसेवांना उड्डाणाचा विलंब टाळता येणार असला तरी विमानांची संख्या कमी होणार असल्यामुळे प्रवासाचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

गेल्या वर्षी मुंबई विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या संख्येने विक्रमी टप्पा पार करतानाच प्रवासी संख्येने देखील ४ कोटींचा टप्पा पार केला आहे. ही वाढती गर्दी हाताळण्यात विमानतळावर उपलब्ध पायाभूत सुविधा कमी पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नियमित विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांना मुंबईतून विमान सेवेत कंपात करण्याची सूचना केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, विमान प्रवासात देशात अव्वल कंपनी असलेल्या इंडिगो कंपनीतर्फे १८ विमाने कमी करण्यात येतील, तर एअर इंडिया समूहातील १७ विमाने रद्द करण्यात येतील, तर अन्य कंपन्यांची पाच विमाने रद्द होतील.
……………………………………………………………………………………..
🔷 ८ तास उड्डाणाला बंदी

🔸 मुंबई विमानतळावरून मोठ्या प्रमाणावर चार्टर विमानांचे देखील
उड्डाण होते. या विमानांच्या सेवे वरदेखील निर्बंध लादले आहेत.

🔸 देशभरातील एकूण विमान वाहतुकीच्या तुलनेत मुंबई विमानतळावरील वाहतूक सर्वाधिक व्यस्त असते.
या मुळे खाजगी वाहतुकीमुळे आजवर अशा खाजगी विमानांना सकाळी ८ ते १० आणि संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत उड्डाण अथवा लँडिंगसाठी बंदी होती. मात्र, आता या कालावधीमध्ये वाढ केली असून, खासगी विमानांना आता ४ ऐवजी ८  तास उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ही विमाने सकाळी ८ ते ११, सायंकाळी ५ ते ८ आणि रात्री ९:१५ ते ११:१५ या कालावधीमध्ये उड्डाण करू शकणार नाहीत.