‘आई रिटायर्ड होते’ ह्या एकांकिकेला मिळाले प्रथम पारितोषिक

मानसिक आरोग्य /मानसिक स्वास्थ्य

IPS WB संस्थेने मानसिक आरोग्य या विषयावर एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले

मुंबई -एम एन सी न्यूज नेटवर्क  स्वस्थ आणि स्वास्थ्य एकमेकांशी निगडित शब्द आहेत. समाजात देशात वाढलेली जीवघेणी समस्या म्हणजे मानसिक रुग्ण यांना योग्यवेळी उपचार मिळून देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. इंडियन सायकियाट्रीक सोसायटी, वेस्ट झोन  व पराग प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने वीर सावरकर स्मारक नाट्यगृह शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे मानसिक स्वास्थ्य संतुलन संवर्धन या विषयावर आधारित एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेचे निकष पूर्ण करणाऱ्या सात संस्थांच्या एकांकिका सादर झाल्या. स्पर्धेस सकाळी साडेआठ वाजता प्रारंभ झाला. मानसिक स्वास्थ्याविषयी सर्वसामान्य जनतेत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी  IPSWZB च्या अध्यक्ष आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर नीना सावंत यांनी एकांकिका उत्सवाचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला असून सातत्याने ‘मानसिक  स्वास्थ्य संतुलन संवर्धन’ अभियानाबाबत डॉ नीना सावंत सातत्याने कार्य करीत आहेत. डॉ नीना सावंत यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले की , मानसिक रुग्णांची संख्या ही आपल्या देशा मध्ये  सवर्वधिक आहे. मुलांना शाळामध्ये वेळीच योग्य शिक्षण देणे गरजेचे आहे. देशात आत्महत्या , डिप्रेशन यांचे प्रमाण वाढले आहे . ह्यावर आळा घालणे गरजेचे आहे. ह्यासाठी आमचा हा खारीचा वाटा आहे. ह्या पुढेही असे कार्यक्रम करत राहू. ”

ह्या कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्व कलाकारांना सन्मानदीप यांनी सन्मान दर्पण आणि सन्मान पर्ण देऊन अभिनंदन करण्यात आले. एकांकिका कऱण्यासाठी स्पर्धक संपूर्ण महाराष्ट्रातून आले होते. प्रथम एकांकी के चे पारितोषिक टीनिटस ह्या एकांकिकेला मिळाले. यासाठी कलाकारांना सन्मान दर्पण, सन्मान पर्ण आणि ५१०००/- रुपयाचे मानधन देण्यात आले. द्वितीय  पारितोषिक ‘आई रिटायर्ड होते ह्या एकांकिकेला मिळाले . त्यांना   २५०००/- रुपये मानधन देऊन सन्मानित करण्यात आले.

मनुष्य सर्दी ,खोकला आणि फ्रॅक्चर साठी डॉक्टर कडे जातात , तर मानसिक सुद्रुढ ते साठी मानसोपचार डॉक्टर कडे देखील जायला पाहिजे असा संदेश ह्या कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांनी दिला. मानवाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व आनंददायी जीवनशैलीसाठी मानसिक अवस्था आणि स्वास्थ्य सुदृढ असण्याची गरज आहे. आपल्या देशात मानसिक दुर्बलतेची पातळी उच्चतम असून फक्त 20% जनताच मानसोपचारतज्ञां कडे जाते हे पडताळणीत आढळले आहे.

भावना नियंत्रित केल्यामुळे व स्वतःकडेच ठेवल्यामुळे त्या नैराश्येच्या गर्तेत जातात. त्या यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते आणि याचा परिणाम म्हणून त्या मानसिक रुग्ण होतात व आत्महत्येचे पाऊल उचलतात.  याचेच प्रतिबिंब आजच्या एकांकिकेच्या  माध्यमातून आणि सादरीकरणातून रसिकांसमोर सादर करण्यात आले.

मुंबई प्रतिनिधी : रमाकांत मुंडे