बालनाट्य स्पर्धा -बीड केंद्र
कु. पूनम ढाकणे रौप्य पदक विजेती तर सर्वेश कान्हेगावकर अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र मानकरी.
बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क -सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन, मुंबई आयोजित २० वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा 2023, नुकत्याच यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड केंद्रावर संपन्न झाल्या. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. स्पर्धेत एकून ३४ बालनाट्य स्पर्धक संघाने बालनाट्य सादर केली. असून या स्पर्धेत श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी प्राथमिक विद्यालयाने सादर केलेले भाऊसाहेब नारनवळे लिखित व संतोष चतूर्भुज दिग्दर्शित चिऊताई चिऊताई दार उघड या बालनाट्यातील चिऊताईच्या भूमिकेसाठी पूनम ढाकणे हिला स्त्री अभिनयाचे रौप्य पदक तर कावळ्याच्या भूमिकेसाठी चि. सर्वेश श्रीकांत कान्हेगावकर यास अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र घोषित झाले आहे.
२०वी बालनाट्य स्पर्धा 2023 मध्ये सादर करण्यात आलेले चिऊताई चिऊताई दार उघड या बालनाट्याचे दिग्दर्शक हौशी रंगभूमी कलाकार संतोष चतुर्भुज हे परळी औष्णिक वीज केंद्रात सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत आहे. दिग्दर्शन, प्रकाश योजना, नेपथ्य, पार्श्व संगीत, या सह तांत्रिक बाबीची बांधणी करत सादर झालेला हा अप्रतिम बालनाट्याचा प्रयोग रसिकांची प्रचंड दाद मिळवून गेला.
विवेक वर्धिनी प्राथमिक विद्यालय प्रथम रौप्य पदक मिळवून जिल्ह्याची मान उंचावली आहे परळी शहराच्या सन्मानात वाढवला आहे चिऊताई च्या भूमिकेतील पूनम ढाकणे ने कसदार अभिनय सादर केला तर चि. सर्वेश कान्हेगावकर याने अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळवले आहे. एकूणच अभिनयासाठी संपूर्ण स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारे चिऊताई चिऊताई दार उघड बालनाट्य टीमच्या सन्मानाचा बहुमान अरुण सरवदे यांनी मिळवला आहे. या अगोदरही पुरुष अभिनय पुरस्कारासह या स्पर्धेत परभणी केंद्रावर सांघिक द्वितीय पुरस्कार बहुमान घेऊन अंतिम फेरीसाठी नगर केंद्रावर सादरीकरण झाले आहे.
चिऊताई चिऊताई दार उघड या बालनाट्यातील रौप्यपदक विजेते ढाकणे पूनम आणि अभिनयाचे गुणोत्तर प्रमाणपत्र मिळवणाऱ्या सर्वेश कान्हे गावकर यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार माननीय बिबीशन चौरे संचालक सांस्कृतिक कार्य मुंबई महाराष्ट्राचे ज्येष्ठ रंगकर्मी व प्रख्यात सिने अभिनेता विजय गोखले, अखिल भारतीय नाट्य परिषद परळी शाखेचे अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
चिऊताई चिऊताई दार उघड या बालनाट्यातील इतर कलावंतांमध्ये प्रिया कर्जतकर, स्वराज जगताप, तृप्ती जायभाय, धनश्री घाडगे, सायली वायबसे, ओमकार दौंड, शताक्षी फड, प्रगती कराड, सिद्धी गडेकर ,दिविजा मुंडे, सातविका गुळभीले, मयंक गरुड, सोहम शिरसाट, अपूर्व महाजन, यांचे शाळेचे सचिव प्रभूअप्पा ईटके,
अध्यक्ष सदाशिव कोळगे, संचालक सुभाष अप्पा भिंगोरे, प्रभाकर पैंजणे, वरिष्ठ शिक्षक विद्यावर्धिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक मातेकर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.