४४ रक्तदात्यांनी रक्तदान केले,शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क -रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ असे एकमेव दान असून या दानात जात, पात, धर्म सर्व काही गळून पडतात आणि माणुसकीचे नाते सुदृढ होते असे प्रतिपादन परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये यांनी केले. ते दि १५ रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती शक्तीकुंज वसाहत, दवाखाना परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात ४४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळी उपमुख्य अभियंता अमित बनकर, प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार, वैद्यकीय अधीक्षक ज्योती रांदड,अधीक्षक अभियंता धनंजय कोकाटे ,अधीक्षक अभियंता राजीव रेड्डी,वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अरविंद येरणे, शिवजयंती अध्यक्ष बालाजी बोंडगे, भीमराव शिरसाट, मानव संसाधन विभागाचे एम एन जाधव,डॉ राजेश गट्टूवार, डॉ प्रितम कांबळे, सुनिल पवार,अंकुश जाधव ,संदीप काळे, अंबिका चौरे,सरवदे,चैतन्य जाधव, चेतन रणदिवे, संदीप पाटील, तुकाराम पाटील, सुनील ढोकळे, केशव जाधव, संदीप कुंदे,दिनेश शिंदे, गजानन मांडरे आदींची उपस्थिती होती.
