संयुक्त अरब अमिरातचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद यांनी कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली- पंतप्रधान.
२७ एकरांवर ७०० कोटी रुपये खर्चून अबुधाबी: संयुक्त अरब अमिरातमधील पहिल्या व भव्य हिंदू मंदिराचे उद्घाटन.
अबुधाबी : (वृत्तसंस्था) यूएईतील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. मोदींनी मंदिरातील
मूर्तीची पूजा केली. अक्षर पुरुषोत्तम महाराजांना पुष्पांजली वाहिली. मोदींच्या हस्ते वैश्विक आरती करण्यात आली.
मंदिर परिसरात बीएपीएस संस्थेचे संत आणि स्वामी ईश्वर चरण दास यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. मोदींनी मंदिर परिसराची पाहणी केली. वॉल ऑफ हार्मनीसमोर अनेक संतांना ते भेटले. या वेळी बॉलीवूड व टीव्ही मालिकेतील काही अभिनेते उपस्थित होते. दरम्यान मंदिराबाहेर मोदींची एक झलक दिसावी म्हणून प्रचंड गर्दी होती. लोक सारखे ‘मोदी… मोदी’ असा घोष करत होते.
………………………………………..
या वेळी पंतप्रधान म्हणाले .. बुर्ज खलिफा, शेख झायद मशिदीसाठी ओळखल्या जाणाऱ्या यूएईला एक नवी सांस्कृतिक ओळख या मंदिराच्या माध्यमातून मिळाली आहे. संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद यांनी कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली आहेत. धन्यवाद या शब्दाने त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे खुजेपणाचे ठरेल. आपण सर्वांनी उभे राहून त्यांच्या या दरियादिलीला मानवंदना द्यावी.