🔸 परळीतून ब्राह्मण ऐक्याचा ‘हूंकार!’राज्यस्तरीय सर्व संघटनांचे संमेलन; दिशादर्शक मार्गदर्शन, चर्चासत्र, समस्यांवर भाष्य, विविध पुरस्कार
🔸ना.धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन: संत- महंतांचे आशीर्वचन, विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती
बीड /परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क- ‘एकतेतून उन्नती’ या सूत्राचा अंगिकार करुन ब्राह्मण समाजाच्या राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, अर्थिक, शैक्षणिक समस्यांवर विचारमंथन व त्यासोबतच वाटचालीचे दिशादर्शक मार्गदर्शन व्हावे यादष्टीने पंचम ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैजनाथ येथून सकल ब्राह्मण ऐक्याचा ‘हुंकार’ पुकारण्यात आला आहे. परळी वैजनाथ येथे २५ फेब्रुवारीला राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.संपूर्ण एक दिवस भरगच्च कार्यक्रम होणार असुन राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे, भाजप राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. परिषदेसाठी संत-महंतांचे आशीर्वच व विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे.
राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या आयोजनाबाबत या परिषदेचे निमंत्रक व स्वागताध्यक्ष परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी या आयोजनाची सविस्तर माहिती दिली आहे.
पंचम ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैजनाथ येथील हालगे गार्डन येथे दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी तीन सत्रात एक दिवशिय राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद सकाळी ९ ते सायं.७ या वेळेत होणार आहे. सकाळी 9.30 वाजता धर्मध्वज पूजन व ध्वजारोहण सोहळा होईल.सकाळी १०.०० वा.उद्घाटन सोहळा होणार असुन उद्घाटक म्हणून ना.श्री. धनंजय मुंडे (कृषीमंत्री- महाराष्ट्र राज्य पालकमंत्री, बीड जिल्हा),पंकजाताई मुंडे (माजी मंत्री तथा राष्ट्रीय सचिव-भाजपा) नमिताताई मुंदडा (सदस्य – केज विधानसभा) या उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे प.पू. सुधीरदास महंत (काळाराम मंदिर, नाशिक), धर्मगुरु प.पू.अमृताश्रम स्वामी महाराज, प.पू. बहुसोमयाजी श्री. यज्ञेश्वर सेलुकर महाराज यांचे आशिर्वचन होणार आहे. या सत्रात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रेरणा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. यामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार स्व.श्री. भरतबुवा रामदासी स्मृती राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार मोहन धुंडिराज दाते (पंचांगकर्ते, सोलापूर) यांना , भागवताचार्य स्व. श्री. वा. ना. उत्पात स्मृती राज्यस्तरीय प्रेरणी पुरस्कार डॉ. मंजूषा पंढरीनाथ कुलकर्णी (प्रशासकीय अधिकारी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई,) यांना तर रणरागिणी स्व.ॲड. अपर्णाताई रामतीर्थकर स्मृती राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार सौ. उज्ज्वला जितेंद्र शर्मा-गौड (संस्थापक अध्यक्षा रणरागिणी महिला विचार मंच, पुणे ) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेत विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. यामध्ये सकाळी ११:०० ते दुपारी १२:०० श्री. सुशील कुलकर्णी (संपादक, ॲनालायजर) विषय ‘आता उठवू सारे रान…!, श्री. विवेक देशपांडे (प्रथितयश उद्योजक) विषय-आर्थिक भक्क्रमताः चला, उद्यमी बनूया, ब्राह्मण संघर्षकन्या केतकी चितळे (प्रसिद्ध सिनेअभिनेत्री) विषय- आपबिती ब्राह्मणांचे दमन, मुस्कटदाबी आणि धैर्य,पंचांगकर्ते श्री मोहन दाते विषय-ब्राह्मणः कालसुसंगत शास्त्रार्थ व धर्माचरण, डॉ. मंजूषाताई कुलकर्णी (प्रशासकीय अधिकारी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई,) विषय ब्राह्मण युवती-ज्ञानज्योती संस्कार, संस्कृती व कालसापेक्ष आचारण, उज्वला जितेंद्र शर्मा-गौड (अध्यक्षा- रणरागिणी महिला मंच, पुणे) विषय- ब्राह्मण मातृशक्ती, जागी हो – ब्रह्मशक्तीचा धागा हो यांचे मार्गदर्शन होणार आहे.दुपारी १:००ते १:१.३० श्री. निलेश बिपीन देशपांडे बासरी वादन होईल.मध्यांतर दुपारी १:३० ते २:०० स्नेह भोजन अशी रुपरेषा आहे.
🔷 द्वितीय सत्र दुपारी २:०० ते ४:०० या वेळेत श्री. सुरेंद्र चतुर्वेदी, उज्जैन (राष्ट्रीय अध्यक्ष ब्राह्मण महासभा) विषय-ब्राह्मण ऐक्य, एकत्रीकरण आणि एकसूत्र, प्रा. महेश पाटील (शिक्षणतज्ञ) विषय-शैक्षणिक दशा व दिशा नव्या संधी, आव्हाने व पर्याय,श्री. भूषण धर्माधिकारी (संचालक- ध्रुव IAS ॲकॅडमी, मुंबई) विषय: अमृत योजना मार्गदर्शन,श्री. विवेक कुंभेजकर(संस्थापक अध्यक्ष ब्रह्म ॲग्रो) विषय-ब्राह्मणांनो शेतीनिष्ठ व्हा!,प्रा. दीपक कासराळकर (प्रसिद्ध व्याख्याते)विषय- नात्यांवर बोलू काही,श्री. श्रीपाद कुलकर्णी (संस्थापक अध्यक्ष BBNG) विषय-ब्राह्मण बिझनेस नेटवर्क मार्गदर्शन, प्रा. डॉ. विजय पाटील (प्रसिद्ध वक्ते मुंबई) विषय- अस्मिता जागृती: ब्राह्मणांनो कधीतरी जातिवंत ब्राह्मण व्हा ! यांचे मार्गदर्शन होणार आहे. यावेळी श्रीराम जन्मभूमी आयोध्या येथील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील पौरोहित्य करणाऱ्या ब्रह्मश्री पं. गजानन ज्योतकर, ब्रह्मश्री पं. विजय पाठक, ब्रम्हश्री पं. शशांक निळेकर या ब्रह्मवृंदांचा गौरव होणार आहे.
समारोपीय सत्र दुपारी ४:०० ते ६:०० या वेळेत होणार असुन यामध्ये परिसंवाद, ठराव, आशीर्वचन, पसायदान,ब्राह्मण ऐक्य शपथग्रहण एवं राष्ट्रगीत होणार आहे.
🔷 ब्राह्मण ऐक्य परिषदेत राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, ब्रह्मश्री बह्मभूषण, ब्रह्मविभूषण, ब्रह्मार्जुन पुरस्कारांचे वितरण
दरम्यान दरम्यान परळी येथे होणाऱ्या ब्राह्मण ऐक्य परिषदेत राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा विविध पुरस्काराने गौरव होणार आहे. यामध्ये समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिकांचा जीवनगौरव कृतज्ञता पुरस्काराने सन्मान होणार आहे.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या परळी वैजनाथ पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांचा वैद्यनाथ भूषण जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे.तर पौरोहित्य वर्गवारीत ब्रह्मश्री, महिला वर्गवारीत राज्यस्तरीय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भगिनींचा बह्मभूषण मनस्वीनी पुरस्कार देऊन गौरव होणार आहे. विविध कला, क्रीडा, कथा,कीर्तन, प्रबोधन, शिक्षण, माहिती प्रसारण,संस्कृती रक्षण या वर्गवारीत ब्रह्मविभूषण पुरस्कार देण्यात येणार आहेत. विविध संघटनात्मक काम करून ब्राह्मण संघटन मजबूत करणाऱ्या संघटना प्रमुखांचा गौरव ब्रह्मार्जुन पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे.
🔷 ब्रह्मभूषण जीवनगौरव कृतज्ञता पुरस्कार : ॲड. कालिदास नाना विगळे (बीड) श्री. अशोकराव गोविंदपुरकर (लातूर) ॲड. मिलिंद पाटील (धाराशिव),श्री. विजय उर्फ बंडूनाना सराफ (परभणी),डॉ. श्रीराम मसलेकर (परभणी) ॲड. संजयराव पांडे (लातूर)श्री. दिनेशकाका पोरे (भूम), श्री. रामभाऊ कुलकर्णी (अंबाजोगाई), श्री. उमेश विर्धे (पंढरपूर), श्री.यज्ञेश्वर लिंबेकर (परभणी), डॉ. अरुण निरंतर (बीड),डॉ.मायाताई कुलकर्णी (लातूर),श्री प्रभाकरराव उदगीरकर (लातूर),डॉ. शरयु शरदराव हंबाळकर (अंबाजोगाई), श्री श्रीकांत नाना देशपांडे (वसमत),श्री. गणेशराव तुळशी (जेष्ठ पत्रकार संभाजीनगर), श्री. उमेशराव कुलकर्णी (कळंब),श्री. चंद्रकांत मूळे (बीड),ॲड.ए. व्ही कुलकर्णी (अंबाजोगाई), श्री. रामेश्वर बद्दर (लातूर)
🔷 वैद्यनाथभूषण जीवनगौरव कृतज्ञता पुरस्कार : डॉ. जे. जे. देशपांडे,श्री शरदराव कुलकर्णी, श्री. वसंतराव देशमुख, प्रा.मधू जामकर, डॉ. भगवानराव सेवेकर श्री उत्तमराव जोशी,डॉ लता रायते,श्री रामदास दादा रामदासी श्री. मनोहरदेव जोशी,श्री. विनायकराव खिस्ते श्री. कुमारशव पुराणीक डॉ. प्रदीपराव जबदे
🔷 ब्रह्मविभूषण पुरस्कार : मकरंद पत्की (अंबाजोगाई) श्री दताभाऊ कुलकर्णी (धाराशिव),श्री प्रवीण कस्तुरे (लातूर)श्री सचिन सरदेशपांडे (परभणी) श्री प्रमोद वाकोडकर (परभणी),श्री. अमित कुलकर्णी (पुणे) श्री.सूर्यकांत देशमुख (वाशी),श्री संतोष मानूरकर (बीड) ह.भ.प. भागवताचार्य श्री.बाळू महाराज उखळीकर (उखळी बु), श्री, अरुणदेव कुलकर्णी (तांदुळा) श्री ऋषीकेश कण्व (परळी वैजनाथ),बालयोगी वरद संतोष जोशी (सिंधखेड राजा),श्री प्रसाद देहडकर (पालघर) श्री निलेश बिपीन देशपांडे (परळी वैजनाथ), श्री संजय निलेगावकर (लातूर)श्री. सुनिल देशपांडे (लातूर), श्री. आलोक चौधरी (पाथरी),श्री. वैभव कुलकर्णी (धर्माबाद),श्री वरुप पाठक (वर्धा)
🔷 ब्रह्मभूषण मनस्विनी पुरस्कार: ऐश्वर्याताई सातभाई (कोपरगांव), अपर्णाताई नेरळकर (नांदेड),अमृताताई काळे (पुणे), जान्हवीताई जोशी (पुणे), संजीवनीताई पांडे (पुणे) अर्चनाताई सरुडकर (बदलापूर), तन्वीताई कुलकर्णी (इचलकरंजी), विजयाताई कुलकर्णी (छ.संभाजीनगर) विजयाताई अवस्थी (छ.संभाजीनगर), शुभांगीताई कुलकर्णी (छ.संभाजीनगर),मीनाक्षीताई देशपांडे (छ. संभाजीनगर), माधुरीताई केदार (गडचिरोली), वनिताताई कानडे (अमरावती),मंजुषाताई कुलकर्णी (बीड),ॲड. संगीताताई धसे (बीड), रश्मीताई सुबोधराव बेळंबे (लातूर),ऐश्वर्याताई जोशी (लातूर), ॲड.मीराताई देवणीकर (लातूर),डॉ. वैशालीताई गोस्वामी (अंबाजोगाई), डॉ. संपदाताई कुलकर्णी (अंबाजोगाई), गीतांजलीताई कुलकर्णी (अंबाजोगाई) रोहिणीताई पाठक-काळे(अंबाजोगाई)
🔸 पश्चिम महाराष्ट्र-श्री. आनंद दवे (पुणे),श्री शाम देशपांडे (पुणे) श्री. विश्वजीत देशपांडे (पुणे),श्री. सचिन परांजपे (पुणे),श्री.अंकित काणे (पुणे) श्री.योगेश मालखरे (पुणे),श्री. मंदार रेडे (पुणे),श्री. भगवंत कुलकर्णी (पुणे),श्री मकरंद कुलकर्णी (कोल्हापूर),श्री. स्वानंद कुलकर्णी (कोल्हापूर), श्री. सुरेश जोशी (इचलकरंजी), श्री. गणेश खाडीलकर (सांगली),श्री मकरंद देशपांडे (नरसोबाचीवाडी),श्री. ओंकार शुक्ला (मिरज), श्री.मानस कमलापूरकर (सांगोला), श्री. काकासाहेब कुलकर्णी (सोलापूर),श्री. उमेश काशीकर (सोलापूर),श्री. श्रीराम बडये (पंढरपूर),श्री गणेशस लंके (पंढरपूर),
🔸 उत्तर महाराष्ट्र :अँड सुहास वैद्य (शिरपूर),श्री, धनंजय बेले (नाशिक),ॲड. भानुदास शौचे (नाशिक), श्री,मकरंद माणकीकर (नाशिक),श्री. संकेत टोके (त्र्यंबकेश्वर), श्री.बा.रा. जोशी (शिर्डी).मुंबई व कोकण :श्री.सु.द. उर्फ पप्पाजी पुराणिक (मुंबई), श्री श्रीकांत वाकणकर (मुंबई),श्री मुकुंद घैसास (मुंबई) श्री. प्रशांत म्हैसकर (डोंबिवली), श्री. नंदकुमार पोरे (नवी मुंबई) श्री. शशांक खेर (ठाणे), श्री. अतुल भिडे (ठाणे), श्री. दिलीपराव आलोणी (ठाणे) श्री. नरेंद्र हार्डीकर (खोपोली),श्री. वैभव जोशी (दापोली), श्री प्रसाद फाटक (दापोली) श्री. श्रीपाद मराठे (रत्नागिरी), ॲड कौस्तुभ मराठे (देवगड), ॲड. प्रशांत करंदीकर (सिंधुदुर्ग) डॉ. प्रकाश दत्तात्रय पटवर्धन (चिपळूण)
🔸 विदर्भ :श्री. श्रीकांत जोशी (अकोला),श्री. विशाल कुलकर्णी (वर्धा), पं. अमित मिश्रा (यवतमाळ), श्री. किशोर काका पाठक (यवतमाळ) श्री. निलेश कुलकर्णी (जळगाव)श्री. विजय देशपांडे (पाचोरा),
🔸 मराठवाडा :श्री. श्रीपाद (पप्पु) कुलकर्णी (लातूर), श्री. सुरेश मुळे (जालना), श्री दीपक रणनवरे (जालना), श्री. निखिल लातुरकर (नांदेड),श्री संजय सुपेकर (गंगाखेड), श्री. सचिन वाडे पाटील (छ. संभाजीनगर),श्री रमण उपाध्याय (जालना), श्री महेश दोरवट (छ. संभाजीनगर ) ॲड. राजेंद्र पोतदार (वसमत),अॅड. आनंद तांदुळवाडीकर (छ.संभाजीनगर) श्री प्रमोद झाल्टे (छ. संभाजीनगर), श्री ईश्वर दीक्षित (छ. संभाजीनगर) श्री. वोगेश पाटील (अंबड), श्री. आशीष बाजपेयी (हिंगोली),श्री शैलेश कुलकर्णी (अंबाजोगाई), श्री मकरंद सोनेसांगवीकर (अंबाजोगाई), डॉ. अतुल देशपांडे (अंबाजोगाई) श्री. शिवाजीदादा कुलकर्णी (अंबाजोगाई), मनोज जोशी (लातूर), श्री पंकज शहाणे (तुळजापूर) श्री. अजिंक्य पांडव (बीड),श्री. दिलीप जोशी (परळी वैजनाथ) श्री. धनंजय पाटील (धाराशिव),श्री. विनायक अहंकारी (नळदुर्ग) श्री योगेश जोशी (पारभणी), श्री. मंदार कुलकर्णी (परभणी), श्री. स्वप्नील पिंगळकर (परभणी), श्री विठु गुरु वझुरकर (परभणी),श्री स्वप्नील गुंडु (सेलू),श्री प्रकाश महाराज केदारे (पाथरी) श्री. लक्ष्मीकांत दडके (पाथरी),श्री श्रीधर गुरु जोशी (गंगाखेड),श्री. शाम कुलकर्णी (गंगाखेड), श्री सुदीप बंगाळे (औंढा नागनाथ), प्रा. डॉ. गणेश आडगावकर (बीड) श्री बाळासाहेब अंबेकर (बीड) प्रा. प्रेरक वैद्य (बीड) श्री. अभय पटवारी (बीड),श्री. संजय उक्कडगांवकर (बीड), श्री. संतोष चिंचोलकर (बीड) श्री. हर्षद आडगांवकर (बीड), श्री महेश महाराज कुलकर्णी (बीड), श्री श्रीकांत पालकर्णी (बीड) श्री. अनिल जोशी (बीड), श्री बाळासोदन थिगळे (बीड),ॲड. रवींद्र देशमुख (बीड), श्री. अभिजित (पप्पु) बरिदे (बीड), श्री.गजानन जोशी (बीड), श्री. विनायक रत्नपारखी (माजलगाव), श्री दत्ता महाजन (माजलगाव),श्री. धनंजय कुलकर्णी (केज) श्री अमोल जोशी (पाटोदा), श्री. अतुल कुलकर्णी आष्टेकर (उमरगा), श्री वैभव पाटील केळगावकर (निलंगा), अॅड. प्रसाद जवळगेकर (निलंगा) श्री श्रीकांत कुलकर्णी (नांदेड), श्री अनिल डोईफोडे (नांदेड) श्री, पदूदेवा जोशी (पालम),श्री अविनाश जोशी (पालम), श्री कृष्ण पांडुरंग जोशी (भोकरदन), श्री मुकेश चिने (भोकरदन), श्री. आभय शिवनगिरीकर (जालना), श्री विजय जहागीरदार (जालना) श्री. अनिरुद्ध चौसाळकर (अंबाजोगाई), श्री विजय पिंगळे (परभणी), श्री. लक्ष्मीकांत परळकर (सोनपेठ).