मुख्याधिकारी, नगर रचनाकार यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी

लाचलुचपत/लाच 

🔸 ५ लाखांची लाच प्रकरण. 

लातूर- अहमदपूर- अंतिम परवानगीचा प्रस्ताव तक्रारदाराने अहमदपूर नगर परिषदेकडे ऑनलाइन चलन भरून सादर केला होता. मात्र, हे काम करण्यास टाळाटाळ करत वेळ लागत होता.  सर्व प्रक्रिया  करून ही काम  होत नव्हते म्हणून तक्रारदाराने नगररचनाकार यांच्याशी पैशाची बोलणी करून, प्रत्यक्ष लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात तब्बल पाच लाखांची लाच स्वीकारताना बुधवारी सायंकाळी रंगेहाथ पकडलेले नगररचनाकार अजय कस्तुरे आणि अहमदपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना गुरुवारी अहमदपूर न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश वडगावकर यांनी १७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार , अहमदपूर तालुक्यातील मरशिवणी येथील सर्वे नंबर ५६ मध्ये ३ हजार ६०० चौरस मीटर क्षेत्राचा व्यवसाय करण्यासाठी अंतिम परवानगीचा प्रस्ताव तक्रारदाराने अहमदपूर नगर परिषदेकडे ऑनलाइन चलन भरून सादर केला होता. मात्र, हे काम लवकर होत नव्हते म्हणून तक्रारदाराने नगररचनाकार यांच्याशी पैशाची बोलणी करून, प्रत्यक्ष लाच स्वीकारत असताना लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यांना गुरुवारी अहमदपूर येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश वडगावकर यांनी मुख्याधिकारी डोईफोडे, नगर रचनाकार अजय कस्तुरे याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षाकडून अॅड. महेश पाटील यांनी काम पाहिले.