🔷 महासंस्कृती महोत्सव/विविध स्पर्धा
बीड –एम एन सी न्यूज नेटवर्क- महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय, मुंबई व बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने महासंस्कृती महोत्सव, बीड येथे 19 ते 28 फेब्रुवारी 2024 दरम्यान घेण्यात येणार आहे. या महासंस्कृती महोत्सव अंतर्गत प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह समाजातील विविध घटका अंतर्गत खेळाडूंची एक टीम विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी निश्चित करण्यात येणार आहे.पत्रकारांच्या विनंतीला मान देऊन, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी पत्रकारांसाठी एक विशेष टीम सहभाग नोंदवण्यासाठी सहमती दिली आहे.
बीड शहरासह जिल्ह्यातील तमाम पत्रकारांना या निमित्ताने आवाहन करण्यात येत आहे की, जे पत्रकार खो-खो, कबड्डी क्रिकेट हॉलीबॉल महिला, जलतरण, रस्सीखेच या स्पर्धेत सहभाग नोंदणी करण्यासाठी तात्काळ 98 22 62 85 21 या नंबर वर आपण कोणत्या खेळामध्ये सहभाग नोंदवणार आहात या माहितीसह आपले पूर्ण नाव, वय, पत्ता, वर्तपत्राचे नाव, किंवा इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियाचे नाव अशी माहिती सविस्तर द्यावी.
या स्पर्धेत जिल्ह्यातील पुरुष आणि महिला पत्रकार सहभाग घेऊ शकतात. तरी आपणास विनंती आहे की, आपण आज दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 9 पर्यंत आपल्या नावाची नोंद, कोणत्या खेळामध्ये सहभाग घेणार आहेत. यासह करावी* ही नम्र विनंती.
🔸टीप – आपण आपल्या नावाची नोंद कार्यक्रम अधिकारी फौजदार राजू गुळभिले यांच्याकडे सुद्धा थेट करू शकता. त्यांचा संपर्क नंबर 99 21 38 17 77.