
🔸न्यू एकता पेंटर असोसिएशन च्या वतीने विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप
बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क – न्यू एकता पेंटर असोसिएशन परळीच्या वतीने संत धुराबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या निमित्ताने शालेय साहित्याचे वाटप करून अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक जगदीश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते भगवान साकसमुद्रे, डिजिटल मीडिया परिषदेचे नितीन ढाकणे, विश्वगामी पत्रकार संघाचे दशरथ रोडे, शिक्षक लक्ष्मण वैराळ, न्यु एकता युनियन कमिटिचे अध्यक्ष पिराजी किर्ते, उपाध्यक्ष नूर भाई, सचिव रोडे संतोष, सहसचिव ओमप्रकाश इंगळे, कोषाध्यक्ष गंगाधर वाघमारे, सदस्य संघपाल कसबे, सत्यवान व्हावळे, राजू होके, प्रशांत सोनवणे, शेख इर्शाद, बालाजी देशमुख आधी सह संत धुराबाई विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

