विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम

🔷 मोतीबिंदू आणि नेत्ररोग

छत्रपती संभाजीनगर/एम एन सी न्यूज नेटवर्क – :दि. १९ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत नेत्र आणि मोतीबिंदू रुग्णांवर मोफत उपचार  केंद्र शासनाच्या विशेष मोहिमेंतर्गत जिल्हा- रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह अशासकीय- स्वयंसेवी संस्थांमध्ये करण्यात येणार आहेत. सोमवारी जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ दयानंद मोतीपवळे यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले

अंधत्व, मोतीबिंदू व गंभीर दृष्टी क्षिणता असलेल्या नागरिकांची नोंद घेऊन आजार निदान झालेल्या मोतीबिंदू रुग्णांची वर्गवारी करून दोन्ही डोळ्यांनी अंधत्व असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी प्रथम प्राधान्य द्या, अशा सूचना डॉ. मोतीपवळे यावेळी केल्या.

केंद्र शासनामार्फत २०२२ मध्ये राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेंतर्गत ५० किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये अंधत्व, गंभीर दृष्टी क्षिणग्रस्त रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष आहे.