शिवजयंती छायाचित्र
बीड/परळी वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील आकर्षक कमानींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शहर व ग्रामीण भागातही शिवजयंती साजरी झाली. यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामुळे परळी शहर शिवमय झाल्याचे चित्र दिसून आले. तरुणाईमध्ये उत्साह दिसून आला.