डीपफेकविरोधात फॅक्ट चेक सेवा

आर्टिफिशियल इंटेलिजन्स / तंत्रज्ञानाचा गैर वापर 

◾मेटा लवकरच देणार सेवा

नवी दिल्ली : डीपफेक तसेच खोट्या माहितीचा वाढता प्रसार लक्षात घेता मेटा आणि एमसीए (मिसइन्फॉर्मेशन अलायन्स) लवकरच व्हॉट्सअॅपवर फॅक्टचेक सेवा आणणार आहे. मार्च महिन्यापासून ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मेटाने म्हटले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून बरीच खोटी माहिती व्हायरल केली जात आहे.

देशात  मार्च महिन्यापासून लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खोट्या माहितीचा प्रचार रोखण्यासाठी मेटाने हे पाऊल उचलले आहे.समाज  माध्यमाच्या माध्यमातून प्रसारित होत असलेल्या गैर प्रकारास आळा घालण्यासाठी मेटा व एमसीएकडून संयुक्त डीपफेक विश्लेषण विभाग सुरू करण्यात येणार आहे.