बिनाका (सिबाका) गीत मालाचा आवाज हरपला…अमीन सयानी यांचे निधन

🔸 वयाच्या 91 व्या वर्षी हृदयविकाराचा झटका; 42 वर्षे गीतमाला हा सुपरहिट शो केला होस्ट

🔸अमीन सयानी जन्म: 21 डिसेंबर 1932 मृत्युः 20 फेब्रुवारी 2024

मुंबई- “नमस्कार  बहनों और भाईयो, मैं आपका दोस्त अमीन सयानी बोल रहा हूं।” गेली 42 वर्षे आपल्या दमदार शैलीने आणि आवाजाने लोकांना रेडिओचे वेड लावणारे अमीन सयानी आता या जगात राहिले नाही. अमीन सयानी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांचा मुलगा रजीलने सांगितले की, अमीन सयानी यांना मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. गुरुवारी वडिलांचे अंत्यसंस्कार होणार असल्याचे रजील यांनी सांगितले.अमीन सयानी यांनी 1952 ते 1994 या काळात गीतमाला हा रेडिओ शो होस्ट केला होता. अमीन सयानी यांच्यामुळे या रेडिओ शोला देशभर लोकप्रियता मिळाली होती.

🔷 पीएम मोदी म्हणाले-

अमीन सयानी यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की- अमीन सयानी जी यांच्या सोनेरी आवाजात सौंदर्य आणि उबदारपणा होता, ज्यामुळे त्यांना अनेक पिढ्यांमधील लोकांशी जोडले गेले. आपल्या कार्याद्वारे त्यांनी भारतीय रेडिओ प्रसारणाच्या जगात क्रांती घडवून आणली आणि आपल्या श्रोत्यांशी एक विशेष बंध निर्माण केला. त्यांच्या जाण्याने मला दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना, प्रियजनांना आणि सर्व रेडिओ प्रेमींच्या दुखाःत मी सहभागी आहे. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.

सयानी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ऑल इंडिया रेडिओ, मुंबई येथे रेडिओ प्रस्तुतकर्ता म्हणून केली. ते 10 वर्षे इंग्रजी कार्यक्रमांचा एक भाग राहिले. स्वातंत्र्यानंतर ते हिंदीकडे वळले. डिसेंबर 1952 मध्ये सुरू झालेल्या गीतमाला या रेडिओ शोमधून सयानी यांना खरी ओळख मिळाली. सयानी यांचा बिनाका गीतमाला हा कार्यक्रम यापूर्वी रेडिओ सलूनवर प्रसारित झाला होता. 30 मिनिटांचा हा कार्यक्रम होता. बिनाका गीतमालावरून ती सिबाका गीतमाला बनली आणि हिट परेड या नावानेही प्रसारित झाली, पण त्याची लोकप्रियता कधीच कमी झाली नाही. यानंतर गीतमाला शो ऑल इंडिया रेडिओ आणि विविध भारती वर प्रसारित झाला.

हिन्दी भाषाची लकब, आवाजातील दमदार पण माधुर्य याच सर्वांनाच वेड-गीतमाला कार्यक्रम बुधवारी रात्री 8 वाजता रेडिओवर प्रसारित करण्यात येत होता. परिस्थिती अशी होती की, प्रत्येक जण या शोची वाट पाहत होता. घर, दुकान, बाजार, सगळीकडे लोक सयानी यांना ऐकण्यासाठी उत्सुक होते. तेवढ्यात आवाज येत “नमस्कार भाइयों और बहनों, मैं आपका दोस्त अमीन सयानी बोल रहा हूं। और अब इस बरस बिनाका गीतमाला की वार्षिक हिट परेड का सरताज गीत यानंतर बिगुलचा आवाज गुंजायचा आणि मग अमीन सयानी म्हणायचे, ‘फिल्म सूरज का गाना है ये बहनों और भाइयों। इसे गाया है मोहम्मद रफी ने।’

सयानी यांचा  गीतमाला शो 42 वर्षे चालला. त्यांनी सुमारे  5 हजार पेक्षा अधिक  रेडिओ कार्यक्रमात आवाज दिला. अमीन सयानी यांनी व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून रेकॉर्ड केले आहे. त्यांनी 54 हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रमांचे आयोजन केले आणि त्यांना आपला आवाज दिला.