🔸प्रवास/ पर्यटन/रेल्वे
🔷 बुलेट ट्रेन- हाय स्पीड कॉरिडॉर
मुंबई- समुद्रावरून, बोगद्यातून भारतीय रेल्वे धावत होती मात्र आता आपल्या देशात प्रथमच रेल्वे समुद्राखालील बोगद्यातून जाईल. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉरवर बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स व शिळ फाटादरम्यान बोगद्याचे काम सुरू आहे.
मुंबईतील विक्रोळी येथें नुकताच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी खोदकामाचा शुभारंभ केला. वैष्णव म्हणाले, प्रकल्पाला वेग देण्यासाठी एकाचवेळी – ४ जागी खोदकाम सुरू केले. बोगद्यात – ३ तळ असतील. खालच्या तळातून रेल्वे धावेल. कॉरिडॉरच्या सूरत- बलिमोरा सेक्शनवर ऑगस्ट २०२६ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार आहे.
◾ समुद्रात ५ किमी खोदकाम न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड (एनएटीएम) तंत्रज्ञानाने होईल. • तात्पुरत्या भिंतीतून बोगदा केल्यानंतर ट्यूब टाकली जाईल. नंतर त्यात रूळ अंथरला जाईल.
■ ट्यूब पाण्यात फिक्स केल्या नंतर तात्पुरती भिंती हटवली जाईल. नंतर ट्यूबमधून रेल्वे धावेल.
🔷गती सुमारें ताशी 300 किलोमीटर
बोगद्यात रेल्वेचा वेग ताशी ३०० ते ३२० किमी असेल. २१ किलोमीटर बोगद्यातील ७ किलोमीटर भाग समुद्राच्या खाली असनार आहे.
![](https://maharashtranewsconnect.com/wp-content/uploads/2024/10/महत्वपूर्ण-ताज्या-घटना-घडामोडी-प्रवास-पर्यटन-स्थळे-खाद्यसंस्कृती-नोकरी-याची_20241001_091754_0000.jpg)