मनोहर जोशी यांच्या निधनाने राजकारणातील सुसंस्कृत, संयमी चेहरा हरपला

पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना

बीड /परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क  दि  २३- माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत व संयमी चेहरा हरपला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मुंडे आणि जोशी कुटुंबियांचे  वैयक्तिक ऋणानुबंध होते.
महाराष्ट्राच्या राजकारणातील ते एक सुसंस्कृत आणि संयमी व्यक्तीमत्व होते. महाराष्ट्र व मराठी माणसाविषयी त्यांना मनापासून तळमळ होती.
जोशी कुटुंबियांच्या दुःखात मी व माझा परिवार सहभागी आहे,सरांना भावपूर्ण श्रद्धांजली !! अशा शब्दांत पंकजाताईंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.